You are currently viewing शब्दांनी शिकविले

शब्दांनी शिकविले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्दांनी शिकविले*

 

शब्दांनीच दिले

बोलण्याचे भान

शब्दांमुळे भाषेची

थोरवी महान….

 

व्यक्त होती भावना

शब्द आहे म्हणून

राग लोभ त्रागा

दिसतो शब्दातून..

 

शब्द बोलता गोड

आनंदाचे गाणे

शब्दबाण टोचती

जिवास वेधणे….

 

शब्द साहित्य मोती

शब्द अनमोल हिरा

शब्द असता उणा

मूक भाव पसारा….

 

शब्द गोड मधाळ

शब्द यावा रसाळ

शब्द भिजती भावनेत

शब्दांचाच लडिवाळ….!!

 

अरुणा दुद्दलवार

@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा