You are currently viewing इन्सुली गावचे सुपुत्र आर. एन. पालव यांचे निधन…   

इन्सुली गावचे सुपुत्र आर. एन. पालव यांचे निधन…  

इन्सुली गावचे सुपुत्र आर. एन. पालव यांचे निधन…

सावंतवाडी

इन्सुली गावचे सुपुत्र व सद्गुरू अवधुतानंद महाराजांचे शिष्य राघोबा नारायण उर्फ आर. एन. पालव यांचे काल शनिवारी रात्री मुंबई ठाणे येथे निधन झाले. ते 63 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

इन्सुली डोबाशेळ हे राघोबा नारायण उर्फ आर. एन. पालव यांचे मुळ गाव. अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेऊन जीवनात मोठा पल्ला गाठला. इन्सुली गावातील शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात त्यांचे मोठे योगदान होते. आपल्या गावातील युवक, युवतींनी पुढे जावे, उच्च शिक्षण घ्यावे अशी त्यांची नेहमी इच्छा होती. त्यासाठी ते नेहमी दातृत्वाची मोठी भूमिका बजावत. गावातील धार्मिक कार्यात सुद्धा त्यांचा मोठा सहभाग असायचा. विद्या विकास मंडळ इन्सुली संचालित नूतन माध्यमिक विद्यालयाचे सल्लागार म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम पाहिले. आपल्या गावातील मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी वेळोवेळी शाळेला आर्थिक मदत केली होती. गावातील जत्रोत्सव, गणेशोत्सव व शैक्षणिक उपक्रमासाठी ते मुंबईतुन गावी येत असत.त्यांच्या जाण्याने इन्सुली गावातील शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. इन्सुली येथील संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्यावर त्यांची फार भक्ती व निष्ठा होती. सोहिरोबानाथ मंदिरा साठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

पालव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण केले. या जीवनप्रवासची वाटचाल ‘ श्रीमंतांचे श्रीमंत ‘ या त्यांच्या जीवनावरील पुस्तकातून समजते. प. पू. सद्गुरू समर्थ अवधुतानंद महाराज यांचे ते परमभक्त होते. माडखोल येथे महाराजांचे समाधीस्थळ, मंदिर निर्माण करण्यासाठी शिष्य म्हणून त्यांनी फार मेहनत घेतली. प. पू. सद्गुरू समर्थ अवधुतानंद महाराज यांच्या ते सुमारे वीस वर्षे सानिध्यात राहीले होते. तसेच महाराजांच्या नावाने ट्रस्ट काढण्यात आली होती त्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते.दरवर्षी महाराजांच्या कार्यक्रमांत आवर्जून सहभागी होत.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुली, सून असा परिवार आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलातील निवृत्त सहा पोलीस उपनिरीक्षक उमाकांत पालव यांचे ते बंधू तर शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांचे ते मेहुणे होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा