You are currently viewing समर्थ साटम महाराज वाचन मंदिर दाणोलीच्या अध्यक्षपदी भरत गावडे तर सचिव पदी डॉ. लवू सावंत

समर्थ साटम महाराज वाचन मंदिर दाणोलीच्या अध्यक्षपदी भरत गावडे तर सचिव पदी डॉ. लवू सावंत

 

सावंतवाडी :

तालुक्यातील ग्रामीण भागात गेली सत्तावीस वर्षे वाचन संस्कृतीला चालना देणारे आणि विविध उपक्रम राबविणारे वाचनालय म्हणून नावलौकिक असलेले वाचनालय म्हणून परिचित असलेल्या समर्थ साटम महाराज वाचन मंदिर, दाणोलीच्या अध्यक्ष पदी सेवानिवृत्त उपक्रमशील शिक्षक भरत गावडे यांची तर सचिव पदावर डॉ. लवू सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

सन २०२४ ते २०२९ पर्यंत संस्थेची निवड पुढीलप्रमाणे –
अध्यक्ष – भरत गावडे, सचिव – डॉ. लवू सावंत, उपाध्यक्ष – भास्कर गंगाराम परब, सहसचिव – गजानन सुमंत गावडे, सदस्य – गिरीधर चव्हाण, जेरॉन मार्सेलीन लॉड्रिक, नामदेव आत्माराम राऊळ, सुरेश नारायण आडेलकर, कृष्णाजी आप्पा परब, शैलेश मेथर, राजाराम दत्तू पाटील, आनंद सखाराम राऊळ, सखाराम मु. तिळवे, सौ. रश्मी रवींद्र सावंत, सौ. रिया रामनाथ सांगेलकर अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

समर्थ साटम महाराजांच्या नावे ग्रामीण भागात गेली सत्तावीस वर्ष सदर ग्रंथालय कार्यरत असल्याने ‘आदर्श ग्रंथालय’ पुरस्काराने या ग्रंथालयाचा गौरव झालेला आहे. विविध शाळांमध्ये ग्रंथांचे वितरण करून वाचन संस्कृती तसेच अवांतर वाचनाची गोडी लावण्यासाठी अनेक उपक्रम सातत्याने राबविले जातात. तसेच प्रौढ वाचकांसाठी विविध मेळावे घेऊन ‘पुस्तक आमच्या हाती, जपतो आम्ही नाती’ यांसारखे विधायक उपक्रम घेऊन घरपोच पुस्तके देण्याची योजना देखील राबविली जाणार आहे. तसेच आगामी काळात ‘आदर्श वाचक गौरव’, ‘चला जाऊ या ग्रंथालयात’, ‘मी वाचले, तुम्हीही वाचा.!’ असे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष भरत गावडे यांनी दिली आहे. श्री. भरत गावडे यांची सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या सतत उपक्रमशील कार्याचा हा गौरव असल्याचे सचिव डॉ. लवू सावंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा