कणकवली:
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यामार्फत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा शुभारंभ आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात झालेल्या या उदघाटनप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे, सिंधुदुर्ग जि. प. माजी अध्यक्ष तथा युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोटय़ा सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, नगराध्यक्ष समीर नलावडे प्राचार्य आर. बी. चौगुले आदी उपस्थित होते.