You are currently viewing शुभचिंतन औक्षण शक्ती

शुभचिंतन औक्षण शक्ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा (आजगाव) चे सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शुभचिंतन औक्षण शक्ती* 

 

व्हावे मंगल त्या गुणवंताचे

करितो आम्ही शुभ चिंतनास |

ज्ञान विश्व त्यांचे अलौकिक हो

हिच प्रार्थना मन ईश्वरास ||१||

सदैव व्हावे शुभ सकलांचे

विद्यार्थी श्रमिक संसारी त्यांचे |

एकमताने हे कलागुणांचे

आदनप्रदान हो मांगल्याचे ||२||

या देशाचे पालक नागरिक

कर्तव्य नियम करु पालन |

उत्तम उदात्त मंगल पाक

हे औक्षण शुभ चिंतन धन ||३||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,

जि.- सिंधुदुर्ग.

प्रतिक्रिया व्यक्त करा