You are currently viewing भेट

भेट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

पादाकुलक वृत्त
*भेट*

 

भेट अचानक होते तेव्हा
जुन्या आठवा डोळे भरती
वरवर शांती परी अंतरी
विचार चक्रे गरगर फिरती

भेट अचानक होते तेव्हा
मुके शब्द अन् नयन बोलती
नसे वाच्यता फक्त शांतता
नयनांमध्ये तिज साठवती

भेट अचानक होते तेव्हा
थरथर थरथर अधर कांपती
श्वासांमध्ये वाढुनि अंतर
हृदयामधले ठोके चुकती

भेट अचानक होते तेव्हा
जुने वाद अन् भांडण स्मरती
रुसवे फुगवे हास्यात विरुनि
हातांमध्ये हातच धरती

भेट अचानक होते तेव्हा
स्पर्शामधुनी ओढ जाणती
मनपटलावर होउनि हलचल
येते लाली गालांवरती

भेट अचानक होते तेव्हा
नयनांचे मग इशारे कळती
अधरांशी अधरांनी बोलुनि
मिटून डोळे मिठास घेती

©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा