_*वीज समस्या सोडविणे वीज विभागाचे कर्तव्य : जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर*_
💡 _साटेली-भेडशी येथे वीज ग्राहक बैठक समाधानकारक ; समस्या सोडविण्याची वीज विभागाची ग्वाही_
दोडामार्ग : “वीज ग्राहकांच्या समस्या सोडविणे ही आपली जबाबदारी आहे. फक्त वाढीव वीज बीलच नव्हे तर आपल्या संकेतस्थळावरील लिखित स्वरूपातील अनेक समस्या साटेली-भेडशी विभागात असून आपण त्या सोडविणे हे आपले कर्तव्य आहे” अशी रोखठोक भूमिका जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी साटेली-भेडशी दशक्रोशीतील ग्राहकांच्या वतीने साटेली-भेडशी महावितरण कार्यालयात मांडली.
दामोदर सभागृह भेडशी खालचा बाजार येथे वीज ग्राहक संघटना दोडामार्ग, व्यापारी संघटना व जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत वीज विभागाचे अधिकारी, कर्मचारी रीतसर बोलावूनही उपस्थित राहिले नाहीत. मात्र उपस्थित वीज ग्राहकांनी वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे बैठकीत आपल्या समस्या मांडल्या. पदाधिकाऱ्यांनी वीज ग्राहकांच्या समस्यांची नोंद करून घेत साटेली-भेडशी महावितरण कार्यालयावर थेट तक्रारदार ग्राहकांसह धडक दिली व ग्राहकांच्या समस्या बाबत सहाय्यक अभियंता श्री.चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्राहक संदेश मणेरीकर-भेडशी, स्वप्निल गवस-खोक्रल, भरत गवस-बोडदे, दशरथ नाईक-भेडशी, चंद्रावती गवस – खोक्रल यांच्या वाढीव वीज बीलाबाबत व्यथा मांडण्यात आल्या. यावेळी सहाय्यक अभियंता यांनी “रीडिंग उपलब्ध नाही” असा शेरा मारून येणारी वाढीव वीज बिले ही समस्या असल्याचे मान्य करून वीज मीटर रीडिंग कॉन्ट्रॅक्टर सोबत संयुक्त बैठक घेण्यात येईल असे सांगितले. यावेळी महावितरणच्या दोडामार्ग कार्यालयातील बिलिंग विभागातील कर्मचारी संदेश सावंत व सतिश जंगले यांनी वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. “दशक्रोशीतील वीज समस्या सोडविणे गरजेचे असून आपण पावसाळ्यापूर्वी येथील ग्राहकांच्या समस्या सोडवा” असे उपस्थित अधिका-यांना सांगण्यात आले. यावेळी साटेली-भेडशी विभागातील ग्राहकांच्या समस्या सोडविण्यात येतील अशी ग्वाही सहाय्यक अभियंता श्री.चव्हाण यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी वीज-ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, सावंतवाडी तालुका समन्वयक बाळ तथा गणेश बोर्डेकर, सावंतवाडी अध्यक्ष संजय लाड, दोडामार्ग अध्यक्ष सुभाष दळवी, सहसचिव भूषण सावंत, सदस्य ज्ञानेश मोरजकर, सिद्धेश केसरकर, नंदकिशोर टोपले, ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी, पत्रकार गोविंद शिरसाट, सोनू गवस, विठ्ठल घोटगेकर, संजय कदम, संदिप टोपले, गौरव वेटे, मिथुन बेळेकर, स्वप्निल गवस, अजित धर्णे, संकेत कुबडे, संतोष आजगावकर, नमिता पार्सेकर, मंगेश शिरसाट, भरत गवस, कृष्णा मोरजकर, संदेश मणेरकर, उदय गोलम, रविकिरण बोंद्रे, राजदत्त वेटे, उदय बुडकुले, प्रसाद बोंद्रे, उदय सरवणकर आदी वीज ग्राहक उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*Once in a lifetime offer*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी करीता
✅ *आरटीओ टॅक्स फ्री* ✅
♻️♻️ *OMG it’s CNG* ♻️♻️
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी..
♻️ *CNG भी Automatic भी* ♻️
🆕 *सीएनजी* मध्ये पहिल्यांदाच *ॲटोमॅटिक* पर्याय देखिल उपलब्ध
✅महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
✅*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
✅*प्रती किमी ₹.३.५०/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
✅ 💪🏼*देशाची एकमेव ४ आणि ५ स्टार ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग ने परिपूर्ण सीएनजी कार*💪🏼
✅आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
✅सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*
*सर्व ॲाफर करीता नियम व अटी लागु.*
जाणून घेणेसाठी आजच संपर्क करा
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/133162/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*