आयटी (IT) क्षेत्रातील ही कंपनी करणार 6000 कामगारांची भरती…
आयटी क्षेत्रात नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी टेक महिंद्रामध्ये फ्रेशर्स कामगारांची मोठी भरती केली जाणार असल्याची माहिती टेक महिंद्राच्या पुणे-मुख्यालयानं दिली आहे.
चालू 2023-24 या आर्थिक वर्षात 6,000 नवीन फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित जोशी यांनी याबाबतची माहिती दिलीय.
दरम्यान, टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही दर तिमाहीत 1,500 पेक्षा जास्त नवीन कामगारांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच या वर्षभरात आम्ही 50000 हून अधिक कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण देणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली. मोहित जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक महिंद्रा आपल्या कामगिरीत सुधारणा करत आहे. आम्ही कामगारांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जोशी यांनी दिली.