विदेशी जिवंत प्राणी प्रजातीची नोंदणी अनिवार्य
सिंधुदुर्गनगरी
केंद्र शासनाने सजीव प्राण्यांच्या प्रजाती (Reporting and Registration) नियम २०२४ अधिसूचित केले आहे. त्यानुषंगाने वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ चे अनुसूची IV Appendix- I. II व III मध्ये समाविष्ठ विदेशी जिवंत प्राणी प्रजातीची नोंदणी अनिवार्य करण्यात आली असल्याची माहिती सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.एन.रेड्डी यांनी दिली आहे.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ कायद्यात सुधारणा करुन दि. १.४.२०२३ पासून Wildlife (Protection) Amendment Act लागू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये Chapter- IVB मध्ये कलम ४९M वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ चे अनुसूचि- IV Appendix- I, II व III मध्ये समाविष्ठ विदेशी जिवंत प्राणी प्रजातीची नोंद करण्यासाठी विशेष तरतुद करण्यात आलेली आहे.
यासाठी संबंधितांनी त्यांच्याकडे असलेले विदेशी प्राणी (अनुसुची-IV) ची नोंदणी करण्याची मुदत ६ महिन्यांची दिलेली आहे. याकामी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांना व्यवस्थापन प्राधिकरणाचे (Management Authority) कार्य करण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात आले आहे. अधिकार प्रदान केल्याप्रमाणे परिवेश-२ पोर्टलमध्ये Reporting and Registration साठी अधिसुचनेत दिलेल्या प्रारुप १ मध्ये नवीन Online अर्ज २८ फेब्रुवारी २०२४ नंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपुर यांच्या कार्यालयास प्राप्त होणार आहेत.
अर्ज चौकशीकामी विहीत मार्गाने उपवनसंरक्षक / विभागीय वन अधिकारी यांना सादर करण्यात येईल. त्यांनी उपनियम (१) नुसार प्राप्त अर्जाबाबत सर्व बाबीची चौकशी करुन अधिसुचनेत दिलेल्या निर्देशानुसार अर्जात नमुद प्राणी/पक्षी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे अनुसूची-IV Appendix I, II व III मध्ये समाविष्ठ आहे किंवा नाही व असल्यास त्याचा Appendix क्रमांक शास्त्रीय नाव इत्यादी तपशील व्यवस्थित तपासुन, उत्पतीचा देश, प्रत्यक्ष मोका तपासणी करुन प्राणी/पक्षांची संख्या (लिंगवार) वयस्क /अवयस्क इत्यादी बाबी तपासुन प्राणी /पक्षांची A-४ Size रंगीत फोटोसह पंचनामा व अर्जदाराचे जबाब सहीत विहीत प्रपत्र प्रारुप–I मध्ये माहीती भरुन तपासणी करणारे अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, उपवनसंरक्षक यांची स्वाक्षरीसह कायदेशीर ताब्याबाबत चौकशी अहवाल १० दिवसात मुख्य वनसंरक्षक (प्रादे) कोल्हापुर यांच्या कार्यालयास सादर करतील.
प्रत्येक अर्ज प्रकरणी अर्जदाराकडून चौकशी/प्रत्यक्ष मौका तपासणी काही त्रुटी किंवा अर्जदाराचे जबाब असमाधानकारक आढळल्यास सदरचा अर्ज नाकारण्यात /Reject करण्याची शिफारस उपवनसंरक्षक / विभागीय वन अधिकारी करतील. याबाबतचा लेखी स्वरुपात स्वाक्षरीसह अहवाल Online परिवेश-२ पोर्टल वरच Upload करावा लागेल. अर्जदाराकडून नोंदणी फी म्हणून रु.१०००/-आकारणी करावयाची आहे. तरी संबंधित अर्जदार यांनी प्रत्येक अर्जा प्रकरणी नोंदणी फी रु.१०००/- Estate Officer O/o P.C.C.F.(HoFF) M.S.Nagpur या नावाने Demand Draft बनवुन Pricipal Chief Conservator of Forests (Wildlife), Maharastra State “Van Bhvan ३rd Floor, Ramgiri Road, Civil Lines, Nagpur-४४०००१” या पत्यावर रजिस्टर पोष्टद्वारे पाठविण्यात यावी.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*