You are currently viewing नरेंद्र भाई मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही देशाची गरज ; महायुती उमेदवार नारायण राणे

नरेंद्र भाई मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही देशाची गरज ; महायुती उमेदवार नारायण राणे

*नरेंद्र भाई मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही देशाची गरज ;महायुती उमेदवार नारायण राणे

*उबाठाच्या उमेदरांचे डिपॉझिट जप्त करणार ,राणे यांनी व्यक्त केला विश्वास

*महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांची पाटीदार (पटेल) समाजाने घेतली कणकवलीत भेट

कणकवली

मोदी पंतप्रधान व्हावेत ही देशाची गरज आहे.मोदी हे अभ्यासू व्येक्तीमहत्व आहे. जगात भारत देशाला तिसऱ्या स्थानावर नेणारे मोदी जीचे नेतृत्व आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना,मोदी सरकारला आणि मला शिव्या घालण्या पलीकडे माझ्या विरोधकांनी काहीच काम केले नाही. त्यामुळे मला येथील उबाठाच्या उमेदरांचे डिपॉझिट जप्त करायचे आहे.असा विश्वास सुद्धा यावेळी भाजप नेते ,महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त केला.
ओमगणेश निवासस्थानी पटेल समाज बांधवांनी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांची भेट घेतली आणि पाठिंबा व्यक्त केला.यावेळी झालेल्या बैठकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे बोलत होते.
यावेळी पाटीदार समाज बांधवांनी आपली मते मंडताना महायुती चे सरकार पुन्हा यावे. नरेंद्र भाई मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत. आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी पटेल समाज कायम सोबत राहणार.आम्ही तुमच्या सोबत आहोत.बहुमताने जिंकायचे आहे. त्यासाठी लागणारे सर्व योगदान पाटीदार पटेल समाज देईल. असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा पटेल समाज बांधवांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थितांची बैठक झाली. यात आमदार नितेश राणे यांचे सह पाटीदार समाजाचे नितीन पटेल, रमण पटेल, मनीभाई पटेल, हितेश पटेल, सुरेश पटेल,बाबुभाई भानुशाली,मंथन पटेल,डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, मिलिंद मेस्त्री आदी प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार नारायण राणे पुढे म्हणले,गुजराती समाज भेटला याचे मनापासून समाधान वाटले. मी मुंबईत मोठा झालो. त्यामुळे गुजराती समाजाचे माझे जवळचे संबंध आहेत.मी उद्योग, व्यवसाय करतो त्याचे मार्गदर्शन गुजराती समाजाकडून घेतले.वर्षाला दोन हाजर कोटीची उलाढाल करणारा गुजराती माणूस सुद्धा सामान्य माणसा सारखा राहतो. ही गुजराती समाजाची पद्धत इतरांनी आत्मसात करावी.तुमच्या सारख्या गुजराती व्यापाऱ्यांकडून स्थानिकांना सुद्धा मार्गदर्शन करावे. गुजरात कच मधून येणाऱ्या रेल्वे गाड्या कणकवलीत,तसेच जिल्ह्यात थांबाव्यात यासाठी मी प्रयत्न करणार. मोदी पंतप्रधान व्हावेत ही देशाची गरज आहे.मोदी हे अभ्यासू व्येक्तीमहत्व आहे. जगात देशाला तिसऱ्या स्थानावर नेणार मोदी जी हे नेतृत्व आहे.आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. चिपी विमानतळ वरून गुजरात जाता येईल अशी सेवा देणार.असे आश्वासन नारायण राणे यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा