*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सदस्या सौ स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम ललित लेख*
*बहरली रानफुले*
शीळ घालत फिरतो वारा
कोसळणाऱ्या पाऊस धारा
ओल्या गंधात दरवळली माती
हिरव्या पानातून पाखरे गाती
दूर कुठेतरी कोंबडा आरवला… आणि पहाटेची चाहूल लागली. देवळात नौबत सुरू झाली… प्रभात गीते भूपाळी यांचे मंद स्वर कानी पडू लागले. रात्रीचा काळोख संपून येणाऱ्या प्रभेची ही सुप्रसन्न चाहूल होती. रुणझुणत्या मंद प्रकाशात ते स्वर विलक्षण गोड सकारात्मक ऊर्जा निर्माण करत होते. पहाटेच्या मंद वाऱ्याची झुळूक मनाला गारवा देत होती. पक्षी अजून चाऱ्या पाण्यासाठी घरट्यातून बाहेर पडले नव्हते पण त्यांची किलबिल मात्र सुरू झाली होती. निळ्या आकाशात विरळ अशा चांदण्या हसत होत्या… निळे जांभळे लाल कडा असलेले ढग एका मागून एक पांगताना दिसत होते… वातावरण थोडे भारावलेलेच होते.
रानातल्या त्या पाय वाटा
हळूच घुसतो पायात काटा
माझी पाऊले कमी वस्तीच्या दिशेने मळ्यातून पायवाटेने रानाच्या दिशेने निघाली. लाजरीची झाडे जमिनींच्या उंचवट्यावरून पाय वाटेवर आली होती. अरे वा ! या लाजाळूची निळी फुले त्या मंद प्रकाशात बहरली होती. अगदी पाना काट्यातून फुलली होती… पहाटेच्या ओल्या स्पर्शाने हळुवार झाली होती… ते जमिनीवरचे फुलांचे जणू थवेच… अरे ही तर रान तुळस किती फुलली आहे.?
रानवेलीवर फुल डोलते
भुंग्या संगे हसून बोलते
आणि हो हा तेरडा…. त्याच्या रंगछटा तरी किती आहेत..? लाल ,पिवळा ,केशरी गुलाबी आणि लागवड केल्या गत अगदी झुपकेदार फुलला आहे. रान वाऱ्यासंगे डुलत गुणगुणतो आहे… हळुवार गार स्पर्शाने गडद रंगात सजला आहे. पिवळ्या हरणाची तर जणू शेतीच पिकली आहे… ही नाजूक पिवळी फुले गार हवे बरोबर दोस्ती करून सळसळत्या वाऱ्याच्या तालावर गात आहेत. वाघनखे मात्र मोठ्या रुबाबात तोऱ्यात दिसत आहेत. पिवळा रान करंडा. जणू पिवळे वस्त्र पांघरून आपली उपस्थिती दर्शवित आहे. भेंडीच्या अगदी पानापानातून गर्द पिवळी फुले बाहेर डोकावत आहेत. तर ही घाणेरी केशरी पिवळी गंध फुले मादक गंधा दरवळत आहेत. किरमीजी तांबड्या फुलांचे गुच्छ वाटणारी शाल्मली डोळ्यांना सुखावते आहे. मंद सुगंधाची मधुमालती बहरली आहे. ही केवढी मोठी पिवळी रान सुर्यफुले उगवत्या सूर्याच्या दिशेने झेपावत आहेत जणू सूर्य नारायणाला नतमस्तक होत आहेत.
ही रान सदाफुली हिरव्या झुडपांवर चांदण्या उतराव्यात तशा पांढऱ्या रंगात चमकते आहे. जणू त्यांचा पांढरा रंग हिरव्या ताटव्यांवर शोभायमान झाला आहे… ही फुले प्रभेच्या स्वागतासाठी जणू जमली आहेत.. ओल्या दवबिंदूच्या स्पर्शाने जागी होत ही फुले प्रभेच्या कोवळ्या सोन किरणात न्हावून सदानंदित सदाफुले सदाबहरतात…. ही फुले म्हणजे आनंदाचे धोतक आहेत या सदाफुलीला ना कोमजण्याचे दुःख..ना सुकण्याची भीती.. ते तर सदा आनंदित सदाबहार सदाफुली आहे…..
खडकावरती फूल फुले
वाऱ्याच्या तालावर ढले
या पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. …पक्षांचे कंठ स्वच्छंद गाणी गात असतात… माती हवे संगे वाऱ्यावर अलगद उडत असते…. नाजूक वेली वृक्षांच्या बाहू पाशात विसावतात….. हिरव्या पानातून वाऱ्याची सळसळ होते… संयमाची ओढलेली शाल जणू निसर्ग झुगारून देतो…… उन्मत्त प्रेमाची उबाळी अगदी छोट्या छोट्या जीव जंतूंच्या अंगातूनही फुटते……
रानातला तो मुक्त रानमेवा
सृष्टीचा हा अनमोल ठेवा
करवंदाच्या जाळी ,हसोळीची झुडपे, जगम, बोर, जांभूळ, चूरनं, कनारा….. हा रानमेवा…
मानवी व्यवहार आणि सुखदुःखापलीकडे असतो हा निसर्ग… या निसर्गातील सूक्ष्म अति सूक्ष्म बदल. आणि सर्वात मोठे विश्वातील बदल ..हीच पंचमहाभूते घडवत असतात….
निसर्ग आपल्याला हजार हाताने देतो. पण सारं काही निसर्गातच राहतं … बीज अंकुरते…. फुलते… फळते …बहरते….विकसित होते… कोमेजते… सुकते… आणि परत मातीत मिसळते….
नवनिर्मिती करणे आणि नष्ट करणे ही सारी त्याचीच किमया आहे.
जन्ममृत्यू हे निसर्गाचे वरदान आहे.
सौ स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
*संवाद मिडिया*
*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*
👩🏻🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻🏫
🟢 *Admission Open 2024-2025* 🟢
📚 *Syllabus as per CBSE* 📚
🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष
❇️ *आमची विशेषता* ❇️
✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS
🟪 *After School Programs* 🟪
🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚
📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS
*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*
🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently
🟩 *Call For Admission* 🟩
🟢 *MRS.SARITA PHADNIS*
*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*
🛣️ *आमचा पत्ता*
*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*