*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी. देशपांडे लिखित अप्रतिम लेख*
*मागे राहून कसे चालेल?*
—————————————–
पार्थच्या बाबांची ट्रान्सफर झाल्यामुळे, सगळी फॅमिली
या नव्या शहरात येऊन सहा-सात महिने होत आलेत.
पूर्णपणे अनोळखी असलेल्या ठिकाणी सगळंच नवं नवं,
शाळा नवी, मित्र नवे, टीचर मॅडम, सर नवे, इतक्या गोष्टी जुळवणे सोपे नव्हते.
घराबद्दल असेच होते, नवी सोसायटी, प्रत्येक बिल्डिंग वेगवेगळी, आपण राहतोय त्यातल्या सगळ्यांच्या ओळखी होणे, नव्या मित्र- मैत्रिणीं सोबत ऍडजस्ट होणे. हे सोपं नाहीये, हे पार्थला रोजच्या रुटीनमध्ये जाणवू लागले.
तसे पाहिले तर या आधीचे शहर मोठेच होते, आताचे शहरही मोठेच होते. पण आधीची गोष्ट वेगळी होती..आधीच्या ठिकाणी पार्थ लहानाचा मोठा झाला होता. साहजिकच पहिल्यापासून सगळ्या सोबत राहून त्याची सगळ्यांशी छान दोस्ती जमलेली होती.
इथे नव्या शहरातल्या नव्या शाळेत त्याने सातवीच्या वर्गात प्रवेश घेतला होता, त्याची शाळा सुरू झाली.
नव्या वर्गात हळूहळू ओळखी होत होत्या, पण पार्थला सगळ्यात मिक्स होण्यास वेळ लागत होता, का कुणास ठाऊक त्याला मनातून फ्री-फील वाटत नव्हते, त्यामुळे
अबोल, मिक्स न होणारा मुलगा” अशीच इमेज झाली.
सोसायटीमध्ये त्याची अशीच मनस्थिती होती. मोकळ्या स्वभावाच्या पार्थचा हा प्रॉब्लेम आता आई-बाबांच्याही लक्षात आला. हा प्रश्न तर गंभीर होता, या साठी वेळ देणे आवश्यक होते.
एका सुटीच्या दिवशी पार्थच्या हातात बाबांनी पुस्तक दिले व म्हणाले-
पार्थ- आम्ही सांगण्यापेक्षा, तू या पुस्तक-मित्राकडून समजून घे, तुझा प्रॉब्लेम सुटण्यासाठी मदत समज ही.
बाबांचे सांगणे त्याने टाळले नाही, व पुस्तकातील लेख ज्याचे शिर्षक होते –
“मागे राहून कसे चालेल ?
पार्थने लेख वाचून काढला, वाचल्यावर त्याला खूप रिलॅक्स वाटले. लेखातील महत्वाचे मुद्दे त्याने वहीत लिहून काढले.
मित्रांनो- हे पॉईंट्स तुमच्याशी उपयोगाचे आहेत, पहा तर खरं..!
१.आपण इतरांपेक्षा कमी आहोत, ही भीती आपला पाय नेहमी मागे खेचत असते, या भीतीवर मात करण्यासाठी
पूर्ण तयारीनिशी समोर आलेल्या कामात सहभागी होईन
“हम भी कुछ कम नही”, हे दाखवता येते.
२. काही ही येत नसतांना, अनेकजण “शायनिंग मारत असतात, या लोकांना आपण स्वतःच्या कामाने उत्तरं देण्यास शिकले तर आपल्यातला आत्मविश्वास वाढू लागतो.
३.सामूहिक कार्यात बाजूला उभे राहून पाहणाऱ्या ला, लोक दूरदूर ठेवत असतात, अशावेळी मागे राहून कसे चालेल ?
४.जबाबदारीचे काम घेण्यापासून पळू नये, उलट ही तर
स्वतःला सिद्ध करण्याची संधी असते, ती साधली नाही तर?
मग तुम्हाला सगळं येतं, यावर कोण विश्वास ठेवेल ?
५.कमी बोलणे “हा स्वभाव असू शकतो, त्यात बदल करता आला पाहिजे. जिथे बोलायची गरज असते, तिथे गप्प बसून कसे चालेल ?
६.छान बोलण्यास, गोड बोलण्यास, सगळ्यांच्या सोबत राहण्यास पैसे लागत नाहीत, तुमची जीभ गोड “तर, सारे जग गोड”,हा अनुभव घ्याच, पण त्यासाठी दोन पावले पुढे यावे लागते, “मागे राहून नाही चालणार.
नव्या ठिकाणी वेळ लागेल, पण लोकांना तुमच्या बद्दल
कळू लागेल ना, तेव्हा बघा, तुमच्याशी मैत्री करण्यासाठी
मित्रच पुढे येतील.
पार्थने तर मनोमन ठरवलंय असेच करण्याचे, आता तुम्ही पण ठरवा दोस्त हो !
—————————————–
लेख- मागे राहून कसे चालेल ?
ले- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
—————————————–
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.