कणकवली जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० अंतर्गत हरकुळ खुर्द मोहोळ नवीन शाळा वर्ग खोल्यांसाठी १६ लाख रु.चा निधी मंजूर झाला आहे.या इमारतीच्या बांधकामाचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
भूमिपूजन कार्यक्रमाला जि प सदस्य सौ. राजलक्ष्मी डिचवलकर, सरपंच सौ. विदिशा तेली, उपसरपंच संजय रावले, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन कमिटी नारायण राणे, मुख्याध्यापक श्रीकृष्ण बोभाटे, हरकुळ बुद्रुक माजी सरपंच आनंद ठाकूर, माजी पं. स. सदस्य महेंद्र डिचवलकर, अजय सावंत, अविनाश रासम, विठ्ठल मोहुळ, ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन कमिटी, पालक उपस्थित होते. शाळेला नवीन वर्गखोल्या मंजूर करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत तसेच जि. प. सदस्य राजलक्ष्मी डिचवलकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.
ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सर्वसामान्य कुटूंबातील व शेतकर्यांच्या मुलांना जि. प. शाळांच्या माध्यमातून चांगले शिक्षण कसे उपलब्ध होईल, यासाठी पायाभूत सुविधा शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. शिक्षणातूनच शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक सुबत्ता येणार आहे, हे लक्षात लक्षात घेता उपरोक्त शैक्षणिक सुविधांमधून आपलि मूले कसे शिक्षण घेतील. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे वाढेल, याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे सतीश सावंत यांनी सांगितले.