You are currently viewing आरोग्य क्षेत्रात जर्मनी येथे रोजगाराच्या सुवर्णसंधी 

आरोग्य क्षेत्रात जर्मनी येथे रोजगाराच्या सुवर्णसंधी 

आरोग्य क्षेत्रात जर्मनी येथे रोजगाराच्या सुवर्णसंधी

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये २२ एप्रिल ला जर्मन समन्वयकांचे मार्गदर्शन..

कुडाळ

22 एप्रिल २०२४ रोजी कुडाळ येथे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जर्मनीतील रोजगाराच्या संधी याविषयी जर्मनी येथील समन्वयकांचे मार्गदर्शन होणार आहे.यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मनीसोबत केलेल्या कराराच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हयातील नर्सिंग व फिजीयोथेरेपी कोर्स केलेल्या विद्यार्थ्याना जर्मनी येथील शासकीय व निमशासकीय प्रथितयश रुग्णालयात विद्यार्थ्यांना काम करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

कोकणात सेमी स्किल्ड तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण खूप आहे. येथील नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, एक्सरे,फिजिओथेरपी यांचे शिक्षण घेत असणारी शेकडो मुलं आहेत व जी मुंबई, पुणे व इतर शहरी भागात अल्पवेतनात कार्यरत आहेत व चांगल्या रोजगाराच्या शोधात आहेत. सद्यपरिस्थितीत महाराष्ट्रात इतक्या रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्या तरी जर्मनीसारख्या गर्भश्रीमंत राष्ट्रात आज अश्या सेमीस्किल्ड मनुष्यबळाची प्रचंड गरज आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जर्मनी सोबत कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार केला आहे.

सुदैवाने या समितीचे अध्यक्ष सिंधुदुर्गचे सुपुत्र शिक्षणमंत्री श्री दिपक केसरकर आहेत व ते शासनाने जर्मनी करारसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रयत्नाने व त्या कराराच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील अर्हताप्राप्त नर्सिंग पदविका व पदवी धारकांना (GNM & Basic B Sc Nursing) तसेच फिजीओथेरपी (BPTh) पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना किंवा अंतिम वर्षास प्रवेशीत Nursing & Physiotherapy विद्यार्थ्यांना जर्मनी मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी या करारान्वये प्राप्त झाली आहे.

जर्मनीचे समन्वयकांचे मार्गदर्शन -या संदर्भात बॅ नाथ पै शैक्षणिक संकुल येथे जर्मनीचे समन्वयक दि. २२एप्रिल २०२४ रोजी दुपारी ०१ वाजता भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत.

या सेमिनार मध्ये जर्मनीत जाण्याकरिता रोजगाराच्या संधी ,पासपोर्ट, व्हिसा व कागदपत्र पडताळणी या विषयी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नर्सिंग व फिजीओथेरपी कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांनी या सेमिनारला उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा. (संपर्क डॉ. व्यंकटेश भंडारी-8796020330. प्रा. सायलीन वारंग-7738925555)असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. उमेश गाळवणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा