You are currently viewing भाजपचे राष्ट्रीय नेते ना. अमित शाह यांची रत्नागिरीतील सभा महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणेंची विजयी सभा झाली पाहिजे

भाजपचे राष्ट्रीय नेते ना. अमित शाह यांची रत्नागिरीतील सभा महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणेंची विजयी सभा झाली पाहिजे

*भाजपचे राष्ट्रीय नेते ना. अमित शाह यांची रत्नागिरीतील सभा महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणेंची विजयी सभा झाली पाहिजे*

*आप-आपसातील हेवेदावे, मानापमान बाजूला ठेवा*

*मनात कोणताही संभ्रम ठेवू नका*

*उद्योगमंत्री व पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन*

*शिवसेनेचे किरण सामंत यांनी फोडला प्रचाराचा नारळ*

*चिपळूण (संतोष सावर्डेकर):—*

महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आप-आपसांतील हेवेदावे व मानापमान बाजूला ठेवा. एकदिलाने काम करूया. कोणीही मनात संभ्रम ठेवू नये. तर भाजप राष्ट्रीय नेते, केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शाह यांची २४ एप्रिल रोजी रत्नागिरीत होणारी सभा महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांची विजयी सभा झाली पाहिजे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी चिपळूण येथील पुष्कर सभागृहात आयोजित महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी केले. यावेळी शिवसेनेचे किरण सामंत यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार शेखर निकम, सिंधुरत्न माजी आमदार मधुकर चव्हाण, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, आरपीयायचे नेते दादा मर्चंडे, जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंत खताते, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, नेते दादा साळवी, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, शिवसेना चिपळूण तालुकाध्यक्ष संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहर मंडळ अधिकारी श्रीराम शिंदे, शिवसेना तालुकाधिकारी निहार कोवळे, माजी सभापती सौ. पूजा निकम, शशिकांत चाळके, मनसे चिपळूण शहराध्यक्ष अभिनव भुरण, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. जागृती शिंदे, शहराध्यक्षा सौ. आदिती देशपांडे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ना. सामंत म्हणाले की, महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी किरण सामंत इच्छुक होते. मात्र, ना. नारायणराव राणेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही राणेंचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, आता संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शुक्रवारी ना. नारायणराव राणेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी किरण सामंत उपस्थित राहिले नसते. तर संभ्रम निर्माण झाला असता. परंतु ते आवर्जून उपस्थित राहिले होते. यामुळे कोणीही मनात संभ्रम ठेवू नये, असा सल्ला ना. सामंत यांनी कार्यकर्त्यांना दिला.

तर ते पुढे म्हणाले की, महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी शुक्रवारी जे वातावरण होते. तसं टिकवून ठेवून राणेंना अडीच लाख मताधिक्याने विजयी करूया. भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांची २४ एप्रिल रोजी रत्नागिरी जी सभा आहे ती महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांची विजयी सभा झाली पाहिजे. सभेची गर्दी पाहून शहाना देखील आपला उमेदवार विजयी होईल, असे वाटले पाहिजे. या दृष्टीने महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेला गर्दी होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असे आवाहन केले.

भाजप महायुतीच्या ४०० पारमध्ये राणे साहेब अडीच लाख मताधिक्याने विजयी झालेले पाहिजेत. राणे साहेबांच्या विजयासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे ना . उदय सामंत यांनी यावेळी आवाहन केले. आपले महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांचा विजय दिमाखदार झाला पाहिजे, याचा पुनरुच्चार महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी यावेळी केला. चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप, आरपीआय व मनसे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले. तर या मतदारसंघातून लोकसभा मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य मिळण्यात कोणती अडचण राहणार नाही, या दृष्टीने आपण सर्वांनी नियोजन करावे, असे आवाहन केले.

तर सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे मेहनत घेऊन प्रत्येक बुथवर होणाऱ्या मतदानामध्ये महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांना ७० टक्केपेक्षा जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने काम करावे, यादृष्टीने एकत्रितपणे नियोजन करून प्रचार करावा, असे उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले.

आ. शेखर निकम यांनी कोणतेही अफवांना बळी पडू नका महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करूया व चिपळूण- संगमेश्वरमधून जास्तीत जास्त मताधिक्य देऊया, असे उपस्थित पदाधिकारी व महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले.

या बैठकीचे सूत्रसंचालन भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी केले. या बैठकीला महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा