You are currently viewing कोंडवाडे

कोंडवाडे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित अप्रतिम लघुकथा*

*कोंडवाडे*
———————————————–
एक अभ्यासू – हुशार विद्यार्थिनी,अशी ओळख असलेली विशाखा कॉलेजच्या फायनल इयरला होती. डिग्री ,त्यानंतर बी.एड
करून “स्कुल टीचर “व्हायचे.
नोकरी करत पीजी करायचे, सेट ,नेट करून प्राध्यापिका व्हायचे ” ,या स्वप्नपूर्तीसाठी तिचे धडपड नि परिश्रम सुरू होते.

भावंडात – मोठा भाऊ,मग विशाखा,पाठची धाकटीबहीण, मग लहान भाऊ असा क्रम होता. मुलाचे चटकन जमते .मुलींचे लग्न जमवण्यासाठी आई-बापांचे जोडे झिजण्याचा काळ होता”. त्यामुळे-

” तू डिग्री मिळवलीस की ,आम्ही तुझ्या लग्नाची घाई-गडबड सुरू करणार आहोत”
हे तिच्या आई- बाबांनी जाहीर करून टाकले.
विशाखाला घरच्या परिस्थितीची जाण होती, ती म्हणाली-
आई-बाबा- इतकी पण घाई नका करू,मला बी.एड नाही, तर डी.एड तरी करू द्या, किंवा छोटा जॉब करू द्या,यामुळे माझे लग्न जमण्यास मदतच होईल.

आई-बाबांना तिचे म्हणणे पटले –
ठीक आहे, होऊ दे तुझे हे शिक्षण,मग बघू.
आई म्हणाली-अहो-
विशाखा समंजस आहे, धोरणी आहे,
निगुतीने करील संसार”, काळजी नका करू.

मोठ्याभावाच्या श्रीमंत मित्राच्या संस्थेत
विशाखाला जॉब मिळाला.
नोकरी करीत मनातील स्वप्न-ईच्छा पूर्ण होण्यास मदत होणार आहे”, दादाने सांगितले.अनपेक्षितपणे मिळालेला जॉब तिने आनंदाने स्वीकारला.

ऑफिस जॉब करीत ती संस्थेच्या सामाजिक कार्यात पुढाकार घेई,सहभागी होई, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची तिची शैली ,सर्वांच्या नजरेत भरत होती.
तिच्या स्वभावातील गुणांनी सगळ्यांना प्रभावित केले.

संस्थेत तिचा सहकारी असणाऱ्या दिवाकरला
विशाखा आवडू लागली.
उत्साही, धडपड्या ,छान वागणारा हा उमदा तरुण विशाखाला आवडला.
दिवाकर-विशाखा प्रेमात पडले,एकमेकांना जाणून घेतले “असे जाणवल्यावर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

दादाचे मित्र – रावसाहेब ज्यांनी हा जॉब दिला होता, त्यांनी एक दिवस विशाखाला बोलावून घेत म्हटले-
ताई-दिवाकरशी लग्न करण्याचा तुमचा निर्णय पक्का आहे ना ?
माणसे दिसतात तशी नसतात ” असा माझा अनुभव आहे “, म्हणून सांगतो, वेळ घ्या, विचार करा, मग ठरवा.
तुमचा दादा माझा मित्र आहे, म्हणून सांगावे वाटले.

विशाखा म्हणाली- रावसाहेब- इतक्या दिवसात मी दिवाकरला समजून घेतले आहे.
मगच होकार दिलाय”.

रावसाहेब म्हणाले-
असे असेल तर काळजी नाही,
“माणूस ओळखण्यात कमी पडलो”,असे
वाटण्याची वेळ येऊ नये ” ,इतकेच..!

नाही रावसाहेब, असे काही होणार नाही,
त्याच्या प्रेमावर माझा विश्वास आहे!

काही महिन्यांनी विशाखा -दिवाकरचे लग्न
झाले”. सगळ्यांना आनंद झालाय याचे
विशाखाला समाधान वाटत होते.

नव्याची नवलाई सरली, आणि प्रेमाची जादू ओसरली की काय ? विशाखा धास्तावून गेली..

ऑफिसतला दिवाकर -तिचा प्रियकर, नवरा झाल्यावर इतका बदलून गेला की विशाखा थक्क झाली.

तिला रावसाहेबांचे शब्द आठवायचे-
खरेच, त्यांनी सुचवले होते..तसं
दिवाकरला ओळखण्यात कमी पडलो का आपण ?

बाहेरच्या जगातला पॉप्युलर दिवाकर,
घरात आल्यावर म्हणायचा-

विशाखा- या पुढे तू फक्त ऑफिसमध्ये काम करायचे, बाकी कुठल्याही कार्यक्रमात तुझे
सगळ्यात पुढे होऊन मिरवणे” मला चालणार नाही.
लग्नाआधी ठीक होते,तू बिनलग्नाची तरुणी होती, माझ्या नजरेत भरली, विषय संपला.

मिसेस विशाखा दिवाकरने लोकांत मिसळून
वागणे, फिरणे मला चालणार नाही.

तुझी नोकरी बंद केली असती, पण काय करू,एकट्याच्या पगारात भागत नाही ना !
त्यासाठी तुझी नोकरी आवश्यक आहे मला.
तू हा जॉब सोडून, टीचर हो, लेक्चरर हो चालेल, तुझा पगार यावा घरात बस !

घर ते ऑफिस- या पेक्षा वेगळं करायचे मनात आणू नको.
या घरातील स्त्रियां बाहेर मनास येईल तसे वागू शकत नाहीत, काही करू शकत नाही.
तू माझ्या आईकडून ऐकू शकते सारे.

घरी आल्यावर तिचा नवरा-दिवाकर त्याचे
वागणे, त्याला सर्वांची साथ नि संमती ,तिला कळेच ना हे काय आहे ?

माझा नवरा, माझा संसार, माझे प्रेम
किती गोड भ्रमात होतो,” लग्नाआधी,

आपण स्वतःच फसलो जाळ्यात, आता काय उपयोग, कुणाला का दोष द्यावा ?

याला घर कसे म्हणायचे?
इथे तर-पुरुषी वर्चस्वाचे”, तिला जखडून टाकणारे साखळदंड ,मनमानी नियमांच्या बोजड बेड्या पायात अडकवल्यात दिवाकरने .

आपण किती सुखात, आनंदात आहोत “हेच दाखवत इथेच राहू, हे सोडून, टाकून देत जाण्याची हिम्मत आपल्यात कधीच येणार नाही” हे दिवाकरने ओळखले आहे.

बाहेरच्या जगात दिवाकरची इमेज
इतकी चांगली होती की,घरातला दिवाकर कुणाला दिसणे शक्यच नव्हते. विशाखाचे माहेर या गुणी जावईबापुवर बेहद्द खुश होते.

आपण चुकलोत हेच खरे,”याला आता क्षमा नाही,विशाखा मनोमन कबूल करीत होती.

या दिवाकर सोबत जन्मठेप भोगत राहणे आपल्या हाती आहे. बाहेरचा हसरा मुखवटा
घरी आला की भिंतीला टांगून ठेवीत राहायचं.
अशा घरात स्त्रीसुलभ भावनांची राख रांगोळी झालेली पहाणे हेच या स्त्रीचे नशीब आहे…

विशाखाला वाटे – एक मुलगी जी-
“लग्नाआधी बापाची लेक, “लग्नानंतर
नवऱ्याची बायको,” होते , मग तिच्यासाठी आहेत ते असे अदृश्य असणारे घराचे बंदिस्त भुईकोट किल्ले,त्यातील कोंडवाडे.

आपल्या सारख्या खुपजणी असतील ,ज्या अशा कोंडवाड्यात राहतात, “मनातल्या धसक्यातून , धक्क्यातून सावरल्यात का त्या कधी ?
कोंडवाड्यातल्या एखादीला पहा-भेटा,मग समजेल –
माणसाच्या गर्दीत वावरणारी “ती “,तिच्याच घरात किती “भीषण असुरक्षित “, आयुष्य जगत असते.
————————————————-
लघुकथा – कोंडवाडे
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
————————————————-

*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*
https://youtu.be/liBWDGhyPuU

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

*जाहिरात लिंक*
https://youtu.be/liBWDGhyPuU

https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा