काँग्रेस नेत्याच्या मुलीची कॉलेजमध्ये हत्या
वर्ग मित्रानेच भोसकले चाकुने
बेळगाव :
कर्नाटकात काँग्रेस नेते निरंजन हीरेमठ यांची मुलगी नेहा हिचा चाकूने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. निरंजन हिरेमठ हे नगरसेवक आहेत. नेहा जिथे शिकत होती तिथेच तिची तरुणाने हत्या केली.
फयाज नावाच्या तिच्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या तरुणाने तिची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फयाजने चाकूचे अनेक वार नेहावर केले. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. नेहाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेजसुद्धा समोर आलं असून याची चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी नेहाच्या हत्या प्रकरणी फयाजला अटक केली आहे. फयाजने नेहाला प्रपोज केलं होतं पण तिने नकार दिला होता. यामुळेच फयाजने तिची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे. नेहाची हत्या करणारा फयाज हा कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात राहतो. नेहा हुबळीच्या केएलई टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीत शिकत होती. कॅम्पसमध्येच तिची हत्या करण्यात आली. नेहाचा मृतदेह केंपगोंडा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी फयाजवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फयाजचे वडील शिक्षक आहेत. तो ६ महिन्यांपूर्वी नापास झाला होता आणि तेव्हापासून तो कॉलेजात फिरकलेला नाही. गुरुवारी कॉलेजमध्ये थेट चाकू घेऊन पोहोचला. यावेळी त्याने नेहाच्या जवळ जात चाकू हल्ला केला. हल्ला करून तो तिथून पळाला होता पण स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांकडे दिला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर फयाज अनेक दिवसांपासून नेहाचा पाठलाग करत होता अशी माहिती समोर येत आहे.
एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. फयाजने त्याच्या अनेक मित्रांना सांगितलं होतं की, प्रपोजला नकार देणाऱ्या नेहाला संपवेन. पोलीस अधिकारी म्हणाले की, प्रेम नाकारल्याने ही हत्या झाल्याचं दिसून येतंय. नेहाचे मित्र आणि नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, या घटनेने कॉलेज कॅम्पस परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*