You are currently viewing पत्रकार गजानन नाईक यांचा आज स्व. ॲड. दिपक नेवगी स्मृती पुरस्काराने होणार गौरव

पत्रकार गजानन नाईक यांचा आज स्व. ॲड. दिपक नेवगी स्मृती पुरस्काराने होणार गौरव

पत्रकार गजानन नाईक यांचा आज स्व. ॲड. दिपक नेवगी स्मृती पुरस्काराने होणार गौरव

सावंतवाडी

श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडीच्या वतीने यंदापासून श्रीराम वाचन मंदिरचे माजी अध्यक्ष कै. ॲड. दीपक दत्ताराम नेवगी यांच्या नावाने पुरस्कार देण्यात देण्यात येणार आहे. या वर्षीचा पहिला नेवगी स्मृति पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांना जाहीर करण्यात आला आहे.

श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी आणि स्व. दीपक नेवगी कुटुंबीयांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.१८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता वाचन मंदिराचा वर्धापन दिन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. श्रीराम वाचन मंदिरला १७२ वर्षे पूर्ण होत आहेत.याचे औचित्य साधून ॲड. दीपक दत्ताराम नेवगी स्मृति पुरस्कार श्री. गजानन नाईक यांना प्रदान करण्यात येणार आहे

यावेळी व्याख्याते विवेक मेहेत्रे (मुंबई ) हे “ती गेली कुठे ?” या विषयाची मांडणी करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. जी ए. बुवा उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम वाचन मंदिर चे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर व कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा