You are currently viewing सावित्रीबाई फुले व माणुसकी गौरव पुरस्कार विजेत्या लढाऊ अलकाताई भुजबळ

सावित्रीबाई फुले व माणुसकी गौरव पुरस्कार विजेत्या लढाऊ अलकाताई भुजबळ

*सावित्रीबाई फुले व माणुसकी गौरव पुरस्कार विजेत्या लढाऊ अलकाताई भुजबळ*

*✍️प्रतिभा पिटके, अमरावती*

मी आज ओळख करून देणार आहे, एका अशा सुंदर स्त्रीची जी अतिशय , सुस्वभावी तर आहेच, पण तेव्हढीच लढाऊ व धाडसी वृत्तीचीही आहे. तिने लढाई लढली कुणा शत्रूशी नाही तर कॅन्सर सारख्या असाध्य रोगाशी ! आपल्या कणखर जिगरबाज वृत्तीने तिने ह्या असाध्य रोगावर मात केली व फिनिक्स पक्ष्यप्रमाणे पुन्हा नवीन विश्व निर्माण केले. ओळखलं ना ? अगदी बरोबर ! मी न्यूज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय पोर्टल च्या निर्मात्या सन्मा.अलकाताई भुजबळ बद्दलच लिहिते आहे. हे पोर्टल ८६ पेक्षा अधिक देशात पोहचले असून 5 लाखांच्या वर वाचक असल्याने, त्यांना गेल्याच वर्षी सावित्रीबाई फुले व माणुसकी गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल इतरही अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. एक स्त्री इच्छा शक्तीच्या जोरावर काय करू शकते ह्याचे उदाहरण म्हणून अलकाताईबद्दल लिहितांना मला विशेष आनंद होत आहे
अलकाताई मूळ मुंबईच्या! मध्यमवर्गीय कुटूंबात जन्म झालेला! त्यामुळे बारावी नंतर शिकायची इच्छा असूनही परिस्थिती समजून उमजून त्या टेलीफोन खात्यात नोकरीला लागल्या. घर, नोकरी आणि शिक्षण अशी तिहेरी भूमिका त्यांनी खुप चांगल्या निभावल्या.
दिसायला खूप सुंदर असल्याने विवाह जुळण्यास त्रास होणार नव्हताच. जोडीदाराविषयी त्यांची एकच अट होती कि श्रीमंत नकोच पण स्वतःच्या कर्तबगारीने पुढे जाणारा, शिक्षणाची जाण असणारा हवा. अगदी नीट पाराखून निवडलं त्यांनी श्री देवेंद्र भुजबळ यांना.
त्यांचा विवाह झाला त्यावेळी ते भारत सरकारच्या मुबंई दूरदर्शन केंद्रात सहायक निर्माते होते, स्वतःच घर देखील नव्हतं, पण स्वतःच्या कर्तबगारीने देवेंद्र भुजबळ नोकरीमध्ये वरच्या पदाला पोहोचले आणि मुंबईत स्थायिक झाले. श्री भुजबळांच्या मदतीने ताईंनी अनेक उपक्रम राबविले उदा अभिनय, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शिबिरे सुद्धा घेतली. सासूबाईंची प्रेमळ साथ होतीच. मुळातच क्रीडा क्षेत्रात आवड असल्याने त्या ऑफिस मध्ये क्रीडा, नाटक तसेच युनियन मध्ये सक्रिय सहभागी होत्या. त्यांनी दूरदर्शन वर दामिनी, बंदिनी, महाश्वेता, आई, पोलिसातील माणूस अशा अनेक मराठी मालिकां मध्ये काम केले. संसारवेलीवर देवश्रीच्या रूपाने एक सुंदर फुल उमलले. सगळे कसे छान सुरू असतांना देवाच्या मनात काही वेगळेच होते क्रूर नियतीने कर्करोगाच्या निमित्ताने जीवनात वादळ निर्माण केले. पण असाध्य समजल्या जाणाऱ्या या आजारावर त्यांनी धैर्याने मात केली. पती व मुलगी, नातेवाईक आणि त्यांच्या मैत्रिणींनी त्यांचे मानसिक बळ वाढविले. ह्या दुर्धर आजारातून बरे झाल्यावर आपल्या अनुभवावर आधारित त्यांनी *कॉमा* हे पुस्तक लिहिले. त्यांनी लिहिलेल्या *कॉमा* या पुस्तकाच्या माहितीपटाचे प्रकाशन राजभवनात तत्कालीन राज्यपाल श्री भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कॅन्सरग्रस्त व्यक्ती व त्यांचे कुटूंबीय यांना दिलासा देण्यासाठी त्या सतत सक्रिय असतात.
त्यांनी अनेक ठिकाणी कॅन्सर वर लोकांना स्वतःचा अनुभव सांगत या असाध्य रोगाशी कसे लढावे आणि काय काय काळजी घ्यावी, आपले मनोबल कसे वाढवावे या बद्दल संवाद साधला आहे. शाळा, कॉलेज, मंडळे येथे हा उपक्रम राबविला जात आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कोणत्याही रोगावर मात करता येते हे त्या पटवून देतात.
स्वतःचा आजाराचा बाऊ न करता त्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुसूत्र नियोजन करतात. त्यांनी सुरु केलेल्या वेबपोर्टल चे काम, ह्यात जे लेख/कविता प्रसिद्ध होतात ते कसे वाचनीय होईल ह्या कडे त्या कटाक्षाने बघतात. म्हणून तर माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते २०२२ साली या वेब पोर्टल ला सन्मानित करण्यात आले. त्या लायन्स क्लब च्या सामाजिक कामातही सक्रिय आहेत. त्यांचे पती व कन्या नेहमी त्यांना चांगली देतात. त्यांचे पती देवेंद्र भुजबळ हे न्यूज स्टोरी टुडे या वेबपोर्टल चे संपादक असून कन्या देवश्री पत्रकार आहे. अनेक पुरस्कार मिळविणाऱ्या अलकाताईंनी देशविदेशात भरपूर प्रवास केला आहे. हे सगळे करतांना त्या कधीच थकत नाहीत अतिशय आनंदी वृत्तीच्या अलकाताईंना कशाचाच जराही अभिमान नाही. न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टल चा भला मोठा व्याप संभाळूनही त्यांचे दैनंदिन जीवन चारचौघी सारखेच आहे. पोर्टल च्या जोडीने त्यांनी मैत्रिणी च्या आग्रहाखातर त्यांनी प्रकाशन व्यवसायातही झेप घेतली आहे अनेक पुस्तकांचे प्रकाशन केले आहे आणि काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी फोन करणार आहे हे कळल्यावर त्यांनीच मला फोन केला आमचे दिलखुलास बोलणे झाले, एव्हढ्या मोठ्या स्तरावर काम करणाऱ्या अलकांताईंशी बोलतांना मनावर दडपण आलेले होते पण पाचच मिनिटात खूप जुनी घट्ट मैत्री असावी असे वाटले. प्रत्यक्ष भेट झालेली नसून त्या मनाने किती निर्मळ आहेत हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. एक जीवाभावाची मैत्रीण मिळाल्याचा आनंद झाला. त्यांची मैत्रीण पूर्णिमा शेंडे नी त्याच्या गुणांवर केलेली कविता त्यांची जीवनशैली स्पष्ट करते. हे जीवन सुंदर आहे ते भरभरून जगावे हा त्यांचा विचार मला खूप आवडला आणि सहज जीवनमृत्यु या सिनेमातील आनंद बक्षीचें गाणे आठवले
*झिलमिल सितारोंका आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा*
संसाराचे असे सुंदर चित्र मनाशी बाळगणाऱ्या, स्वप्ने पाहणाऱ्या
अशा या अष्टपैलू, उत्साही, निर्भीड व तितक्याच मनमिळावू प्रेमळ अलकाताईंचा १८ एप्रिलला वाढदिवस आहे. त्यांना माझ्या मनापासून खूप शुभेच्छा.
अलकाताई, जीवनात सर्व सुखे तुम्हाला मिळोत आणि दश दिशात तुमच्या यशाचा सुंगध पसरो.

प्रतिभा पिटके
अमरावती

9421828413

*संवाद मीडिया*

🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬

*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर ‌‌चौथा प्रोजेक्ट…*

*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*‌मालवण*

*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*

*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..

*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*

*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*

*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*

*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*

*🔹बुकिंग संपर्क 🔹*

*👉‌‌रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*

*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*

*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*

*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*

*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा