*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रीराम स्तुती*
रघुवीर नंदन
मर्यादा पुरुषोत्तम
शालीन सुकुमार
गुणवान राजाराम. !
अयोध्येचा राजा
दशरथ- कौसल्या सूत
दैत्य संहारक पूत
पवन हनूमान दूत !
तारणहार श्रीराम
अयोध्येसी मुक्काम
प्रजेचा अभिमान
जय जय श्रीराम !
एकवचनी – एक वाणी
राम वसे मनोमनी
राम नाम मुखी घेता
कैवल्याचा तोच धनी !
सुहास्य वदन
बंधू शत्रू- लक्ष्मण
आज्ञेचे पालन
कृपासींधू संजीवन!
स्त्रीयांचा सन्मान
आनंद निधान
मनात आत्माराम
जय सीताराम!
तोच रघुनंदन
आश्वासक, आज्ञाधारक
दुबळ्यांचा रक्षक
कुशल प्रकाशक !
रघुवंश कुळाचा
पती सीतामाईचा
आदर्श बंधू सर्वांचा
जयजयकार श्रीरामाचा!
अशा श्रीरामास
करूया वंदन
साष्टांग नमन
रामनवमी दिन !
स्वनिर्मित काव्यरचना. !
सौ योगिनी पैठणकर नाशिक.