वेंगुर्ले
वास्को-गोवा येथे झालेल्या अपघातात वेंगुर्ले-कोलवेळवाडी येथील नवविवाहितेचा मृत्यू झाला आहे. संचिता सचिन करलकर (वय २३) असे तिचे नाव आहे. हा अपघात २४ डिसेंबरला झाला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, भोगवे येथील सचिन करलकर यांचा दहा महिन्यांपूर्वी तालुक्यातील गोवरी भगतवाडी येथील तेजस्विता उर्फ श्रद्धा जगन्नाथ पाटकर यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर तेजस्विनी ही संचिता सचिन करलकर बदली. दोघे पती-पत्नी सुखात होते. गोवा येथे दोघे कामाला असल्याने आपल्या विश्वात आनंदात होते. मात्र त्यांच्या सुखी कुटुंबाला कुणाची तरी दृष्ट लागली. गुरुवार २४ डिसेंबर रोजी संचिता आपल्या पती सचिन सोबत दुचाकीवरून कामावर जात होती. मात्र वास्को न्यू वाडा येथे दुचाकी आली असता गाडीचा टायर पंक्चर होऊन संचिता मागच्या मागे रस्त्यावर कोसळली. या अपघातात संचिता रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडर आपटली यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सचिन याने स्थानिकांच्या मदतीने तिला तात्काळ गोवा बांबुळी येथे उपचारासाठी हलविले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. काल शुक्रवार २५ डिसेंबर रोजी तिच्यावर भोगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात पती, सासु, दीर, भावजय, आई-वडील, बहीण असा परिवार आहे. या दुःखद घटनेमुळे करलकर व पाटकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.