You are currently viewing कोलगाव येथील निरामय विकास केंद्राचा १९ सावा वर्धापन दिन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा

कोलगाव येथील निरामय विकास केंद्राचा १९ सावा वर्धापन दिन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा

कोलगाव येथील निरामय विकास केंद्राचा १९ सावा वर्धापन दिन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा*

सावंतवाडी

कोलगाव येथील निरामय विकास केंद्राचा १९ सावा वर्धापन दिन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ अमृता स्वार यांना आरोग्य लक्ष्मी पुरस्कार, डॉ वैशाली पडते यांना आरोग्य सेवा पुरस्कार तर प्रतिकूल परिस्थितीत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्यांना विद्यालक्षमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोलगाव निरामय भवन येथे झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्याला सावंतवाडीच्या प्रसिध्द डॉ. अमृता स्वार, स्टेट बँकेच्या निवृत्त अधिकारी अर्चना वझे, सुधा सबनीस, डॉ वैशाली पडते, निरामय केंद्राच्या विश्वस्त वंदना करंबेळकर, विश्वस्त भरत गावडे, अँड सुषमा राऊत -धुरी आदी उपस्थित होते
या वर्धापन दिन सोहळ्याचा शुभारंभ दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने केल्यानंतर निरामय गित सादर करण्यात आले. अहवाल वाचन अँड सुषमा राऊत -धुरी यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निरामय केंद्राच्या विश्वस्त वंदना करंबेळकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी डॉ. अमृता स्वार यांना सुधा सबनीस यांच्याहस्ते आरोग्यलक्ष्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी सौ सुप्रिया राऊळ (एम.फॉर्म), कु श्रद्धा कोठावळे (बी. फार्म), कु रुचिता नाईक (बी.फार्म) यांना विद्यालक्ष्मी सन्मान पुरस्कार आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मुलांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या शैक्षणिक जीवनात निरामय विकास केंद्राने केलेल्या आर्थिक मदतीमुळे शिक्षण घेऊ शकलो असल्याचे आवर्जून सांगितले.
तसेच यानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी व पाककला स्पर्धेतील सर्व यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी शालेय मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत हा वर्धापन दिन सोहळा यादगार ठरविला. तर कु सोहम साळगावकर याने भाव व भक्ती गीते सादर करून उपस्थिततांना मंत्रमुग्ध केले. यावेळी डॉ अमृता स्वार यांची प्रकट मुलाखत वंदना करंबेकर यांनी घेतली. यावेळी डॉ अमृता स्वार यांनी मुलाखतीद्वारे आपल्या आरोग्य सेवेसह शैक्षणिक व सामाजिक कार्याचा प्रवास उलघडून सांगितला. यावेळी निरामय केंद्राचे विश्वस्त भरत गावडे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा