You are currently viewing नव्या युगाची ही कहाणी

नव्या युगाची ही कहाणी

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्वप्नगंधा आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

नव्या युगाची ही कहाणी

 

मजल्यावर मजले चढत

जाती आकाशात,

तळमजल्यावर नाही कुणी,

मिळेना‌ वरणभात.

 

स्वतः स्टेटस् सांभाळता सांभाळता,

माणुसकी हरवली आहे

याचा नाही पत्ता.

 

बालक, अन् आपले पालक कसे,

झालेत, एकलकोंडे

केविलवाणेसे.

 

तरुणाई लागली ही कमाईच्या मागे,

त्यांना नाही माहीत

नात्यांचे हे धागे.

 

उंच महत्त्वाकांक्षेची

गरुड भरारी,

आठवेना कसे गेले

बालपण भुवरी.

 

परदेशगमनाची स्वप्ने

करती खरी,

कोर्यानोटांच्या चळतीने

भरती तिजोरी.

 

विसरती आईबापांचे

हलाखीचे दिन,

स्टेट्स जपण्या आतुर

विसरती ते ऋण.

 

सर्वच नसती पुत्रसारखे

कुणी श्रावणबाळ,

मातपित्यांचे आधारस्तंभ

ते करिती सांभाळ.

 

नव्या युगाची ही कहाणी

कुठे केविलवाणी,

क्वचित दिसेमाणुसकीही

खणखणीत नाणी.

 

🌜🌛🥀🌹

🌹अंतर नवे जुने🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा