*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्दांचा प्रहार*
जेव्हाही चाले
शब्दांचा प्रहार,
मनावर करी
घाव अपार..।१।
मारण्याचे घाव
जातात मिटून,
शब्दांचे घाव
राहतात टिकून..।२।
शब्दच मनुष्याला
मिळवून देतो मान,
शब्दाने कधी कुणाचा
करू नये अपमान..।३।
शब्दाने शब्द जोडून
नवीन कविता बनते,
वापरा योग्य शब्द
मनाचे नाते जुळते..।४।
सर्वात मोठी संपत्ती
जगतात शब्दाची,
त्यालाच मिळते
साथ प्रारब्धाची..।५।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*