You are currently viewing राऊळीचा राम

राऊळीचा राम

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*राऊळीचा राम*

**************

अशाच सुरम्य सांजवेळी

तृप्तले रांजण ओसंडावे

हा दैवयोग असा लाघवी

मनराऊळी चंदन उगळावे….

 

खेळ साराच रामकृपेचा

असे कृतार्थ जीवन व्हावे

मनप्रांगणी भाव निष्पाप

अलवार सदैव ओघळावे….

 

सरले किती , उरले किती

त्या श्रीप्रभूरामलाच ठावे

सारेसारे ऋणानुबंध दैवी

सुखे स्पंदनांना कुरवाळावे…

 

कोण कधी , भेटेल केंव्हा

प्रतीक्षेत मनांतरा गुंतवावे

संचिताचेच दान भाळीचे

ओंजळीत झेलावे प्रीतभावे….

 

*जे जे संकेत , ते ते प्रारब्ध*

*जाणुनी आत्म्यास तोषवावे*

*युगायुगांचाच जन्म मानवी*

*लोचनी श्रीरामास साठवावे….*

**********🕉️**********

*रचना क्र. ६८ / १२ / ४ / २०२४*

*#©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*📞( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा