You are currently viewing डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची देशाला गरज; सौ. अर्चना घारे परब

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची देशाला गरज; सौ. अर्चना घारे परब

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची देशाला गरज; सौ. अर्चना घारे परब*

सावंतवाडी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तसेच विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले.

” डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. दूरदृष्टी ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम या माध्यमातून केले. जगातील या सर्वश्रेष्ठ राज्यघटनेची आज पायमल्ली होत आहे. ती होता कामा नये. ” अशा प्रकारच्या भावना यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री मा. प्रवीण भोसले यांनी व्यक्त केल्या.
तर यावेळी महामानवाला अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब म्हणाल्या की, ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली राज्यघटना बदलण्याचा घाट सध्या घातला जात आहे. त्यासाठी 400 पार चा नारा दिला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेली जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आज धोक्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आज देशाला गरज आहे. आपल्या राज्यघटनेवरील लोकशाही वरील हा हल्ला परतवून लावण्यासाठी आपण सज्ज होऊयात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला भारत संविधानाने दिलेल्या मार्गाने उभा करूयात.

या वेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, जिल्हा बॅक माजी संचालक विकासभाई सावंत, शिवसेना ( ऊ.बा.ठा.) तालुका प्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवा टेमकर, शहर अध्यक्ष सायली दुभाषी, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, सोशल मिडीया फ्रंट चे जिल्हाध्यक्ष संजय भाईप, विद्यार्थी तालुकाध्यक्ष ऋतिक परब, युवती कुडाळ तालुका अध्यक्ष स्वाती पालयेकर, युवती उपाध्यक्षा राधीका धुरी, सरचिटणीस विषाखा नाईक उपस्थित होते. नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सागर सालुंखे , समाजमंदिर समन्वय समिति अध्यक्ष केशव जाधव, सचिव विनायक जाधव, कांता जाधव, सगुण जाधव , कविता निगुड़कर यानी आयोजन केले होते

*संवाद मीडिया*

📣🎊🎊📣🏢🎊🎊📣

*सावंतवाडीचे 📱”मोबाईल माॅल”📱शॉप घेवून आले आहेत, गुडी पाडवाच्या शुभ मुहूर्तावर 5️⃣ इन 1️⃣ ऑफर📣🎊🎊🎊🎊🎊*

*_🎊गुडी पाडवा सणानिमित्त 5️⃣विशेष ऑफर 🎊_*

*1️⃣ चांदीचे नाणे* 🪙
*(रु. 2️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣ वरील मोबाईल वर )*

*2️⃣ रु.10000/- पर्यंत शॉप डिस्काउंट*

*3️⃣ रु.4000/- पर्यंत बजाज फायनान्स कॅशबॅक ऑफर*💰

*4️⃣ EXCHAGE ऑफर (जुना मोबाईल द्या आणि नवीन मोबाईल घ्या)*📱📲

*5️⃣ ॲक्सेसरीजवर तब्बल 75 टक्के पर्यंत डिस्काउंट…!!*

*🥳ऑफर कालावधी 0️⃣7️⃣ एप्रिल 2️⃣0️⃣2️⃣4️⃣ते 1️⃣1️⃣ एप्रिल 2️⃣0️⃣2️⃣4️⃣🥳*

*👉🏻आता फक्त 79 रुपये द्या💸 आणि थेट आयफोन घेवून जा…!!📱*

*-👉🏻किंवा फक्त 101 रुपये द्या💰 आणि तुमचा आवडीचा🥰 कोणताही मोबाईल घेऊन जा…!!📱*

https://sanwadmedia.com/131774/

*🤗आणि हो…!! स्पीकर🔊, नेक बँड🎧, बर्ड्स🦻, पॉवर बँक🪫 या सारख्या ॲक्सेसरीज🛍️ सुद्धा फायनान्सवर📑 उपलब्ध…!!🤗*

*इतर 📱मोबाईलवर तब्बल 30% पर्यंत डिस्काउंट..!!🎊*

*👉🏻0% (शुन्य टक्के) 📈 व्याजदरावर बजाज फायनान्सची📑 सोय…!!*

*👉आवश्यक कागदपत्रे :- PANCARD, आधारकार्ड, बँक पासबुक*

*🎴आमचा पत्ता👇*

*मोबाईल मॉल*

*हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी*

*☎️संपर्क*
*📲9422585786*
*📲7057262255*

*🔖नियम व अटी लागु.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131774/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा