कु.स्वराध्या निलेश पेडणेकर सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत सुवर्णपदकासह जिल्ह्यात इयत्ता दुसरी मधून प्रथम..
वेंगुर्ले
युवा संदेश प्रतिष्ठान तर्फे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत (एसटीएस) 2024 परीक्षेत केंद्र शाळा मठ नंबर १ ची इयत्ता दुसरी मधील विद्यार्थिनी कुमारी स्वराध्या निलेश पेडणेकर हिने 200 पैकी 192 गुण मिळवून सुवर्णपदकासह जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. संस्थेमार्फत गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी तिची निवड झालेली आहे तसेच ब्रेन डेव्हलपमेंट 2024 या परीक्षेत शंभर पैकी 90 गुण मिळवून ब्राॅझ पदक पटकावले आहे स्वराध्याला तिचे आजोबा सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. बाबुराव विठ्ठल कांबळी तसेच वर्गशिक्षिका सौ. अंजली माडये मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री अजित तांबे सर तसेच सहाय्यक शिक्षक श्री चिंदरकर सर, श्री नाईक सर, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.