तळेरे :
महामार्ग चौपदरीकरण कामावेळी गतवर्षी नडगिवे- खारेपाटण हद्दीवरील आवेरा पुला नजिकच्या ओढ्यात मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा भराव टाकून त्या ओढ्याचा मार्ग बूजविण्यात आला. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह खंडित झाला व तुंबला. या तुंबलेल्या पाण्याचा प्रवाह आपल्या सामाईक शेतजमिनीतून जाऊन बागायती शेतीचे माठे नुकसान झाले. शेतजमीनीतील माती, कंपाउंड व लागवड केलेली झाडे वाहुन गेली. या नुकसानी बाबत संबंधित ठेकेदार कंपनी, शासन व प्रशासन यांच्याकडे वारंवार दाद मागूनही कार्यवाही न झाल्याने किसान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमूदत उपोषण शेतकरी गुरव यांनी त्याच दिवशी रात्री मागे घेतले. याप्रसंगी रिजेश जाधव, मंगेश गुरव, गोट्या कोळसूलकर, प्रमोद वांयगणकर, प्रकाश मोहिर, अक्षय मेस्त्री आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी अखेर निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची भेट घेत उपोषणा बाबत माहिती देउन चर्चा केली. नागिरी यांच्याशी संपर्क साधला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपविभाग खारेपाटणचे कनिष्ठ अभियंता कुमावत व केसीसी बिल्डकाँन प्रा. लि. या संबंधित ठेकेदार कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक पांडे हे रात्री आठच्या सूमारास उपोषणस्थळी आले. नुकसानीची भरपाई मुल्यांकन दरानुसार ३१ डिसेंबरापूर्वी अदा करण्यात येईल, असे उत्तर दिले.