You are currently viewing “शिवबा हे महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत!” – ह. भ. प. नूर महंमद अत्तार

“शिवबा हे महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत!” – ह. भ. प. नूर महंमद अत्तार

*”शिवबा हे महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत!” – ह. भ. प. नूर महंमद अत्तार*

*श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४ – अंतिम पुष्प*

पिंपरी

“विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा हे महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत आहेत; तर पंढरपूर हे भाविकांचे माहेर आहे!” असे प्रतिपादन ह. भ. प. नूर महंमद अत्तार यांनी बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे बुधवार, दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी केले. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवात कीर्तनसेवेच्या माध्यमातून ह. भ. प. नूर महंमद अत्तार आणि सहकारी यांनी अंतिम पुष्पाची गुंफण केली. याप्रसंगी मंदारमहाराज देव, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, ॲड. मोरेश्वर शेडगे, शेखर चिंचवडे, प्रताप बारणे, विश्वजित बारणे, गतिराम भोईर, मधू जोशी, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील), उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे (पाटील), हेमा दिवाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

“पुत्राचिये वार्ता | शुभ ऐके जेवी माता | तैसें राहो माझें मन | गाता ऐकता हरिगुण | नादें लुब्ध जाला मृग | देह विसरला अंग | तुका म्हणे पाहे | कासवीचे पिल्ले माये |”

हा जगद्गुरू तुकोबाराय यांचा अभंग निरूपणासाठी घेण्यात आला होता. “जिजाबाई नसत्या तर शिवबा नसते अन् शिवबा नसते तर हिंदू धर्म अस्तित्वात राहिला नसता. स्वामी समर्थ यांची भक्ती करण्यासाठी हा नरदेह मिळाला आहे. भक्तांचे रक्षण करतात म्हणून त्यांना स्वामी समर्थ म्हणतात. स्वामी समर्थांची कृपा हवी असेल तर स्वतः त्या योग्यतेचे बना. गुरू शोधून मिळत नाही!” असे सांगून त्यांनी,
“श्री गुरुसारिखा असता पाठीराखा | इतरांचा लेखा कोण करी ||”
हा अभंग उद्धृत केला.
ह. भ. प. सुखदेवमहाराज बुचडे आणि सहकारी यांनी कीर्तनात साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या दरम्यान मंडळाच्या वतीने आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या चंद्रभागा तावरे यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तावरे कुटुंबीयांनी पुरस्कार स्वीकारला.

उत्सवात पहाटे ४:३० वाजता श्रींचा केशर दुधाने अभिषेक आणि पूजा, स्वामी गायत्री जप, श्रींचा सामुदायिक रुद्र अभिषेक, श्रींची आरती, महानैवेद्य आणि आरती, भाविकांसाठी महाप्रसाद वाटप, दुपारी १२:३० ते रात्री ८ वाजेपर्यंत भजनसेवा, सायंकालीन आरती इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. सत्संग मंडळाचे सदस्य कैलास भैरट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬

*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर ‌‌चौथा प्रोजेक्ट…*

*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*‌मालवण*

*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*

*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..

*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*

*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*

*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*

*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*

*🔹बुकिंग संपर्क 🔹*

*👉‌‌रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*

*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*

*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*

*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*

*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा