You are currently viewing विसावले मन

विसावले मन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विसावले मन*

 

संसाराच्या चक्री देवा का मी फिरतो?

मोहमयी या नगरीमाजी का रे फसतो?

 

धावत होतो एकसारखा लोभापायी

विवेक नाही उरला माझ्या ठायी ठायी

 

चराचरीचा देव कसा मज नाही दिसला

नात्यामधला प्रेमभाव तो कसा विसरला?

 

षड्रिपुनी का मला घेरले तुम्ही सोडवा

द्वारी आलो देवा तुमच्या मार्ग दाखवा

 

अवलोकुनिया तटस्थ वृक्षा नदीकिनारी

कर्म करावे तरूपरी त्या मना उभारी

 

नकोच मजसी काही आता देह झिजावा

श्रान्त मनाला तोच वाटतो एक विसावा

 

लोभ जराही मनी माझिया उरला नाही

क्रोधालाही थारा आता नुरला काही

 

उमज मला ही चराचरी तो देव पहावा

तोच एकची वाटे मजला जिवा विसावा

 

गाज ऐकता दर्यावरची मुरली भासे

कृष्ण सखा मज दिसतो आहे ह्रदयी हासे

 

कणसे भरती शेते डुलती दृष्य साजिरे

तेथे दिसते भगवंताचे रूप गोजिरे

 

नाही उरले मीपण माझे भेट शिवाची

विसावले मन प्रभुचरणांशी वृत्ती साची

 

*अरूणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

 

 

*संवाद मिडिया*

 

*यंदाच्या गुढीपाडव्याला घरी आणा नविन हिरो….. 🛵🏍️*

 

*सविस्तर वाचा 👇*

——————————————

🪄 *यंदाच्या गुढीपाडव्याला घरी आणा नविन हिरो…🛵🏍️*

 

👉 स्कुटरवर 3000 चा कॅश डिस्काउंट 🛵

 

👉 HF DLX वर 2500 चा कॅश डिस्काउंट 💸

 

👉Xtreme / Xpulse वर 5000 चा एक्सचेंज बेनिफिट 😇

 

👉 Destini Prime फक्त 89,999/- ऑन रोड

 

👉 Flipkart बुकिंग वर भरपूर सुट

 

👉 एक्सचेंज / फायनान्स उपलब्ध

 

👉 ऑफर फक्त 12 April 24 पर्यंत

 

👉 अटी लागू

 

👉 आजच बुक करा…📝

 

🎴 मुलराज हिरो कुडाळ – 9289922336 / 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा