You are currently viewing गुढी उभारू सौख्याची…

गुढी उभारू सौख्याची…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुढी उभारू सौख्याची …*

 

 

गुढीपाडव्याचा दिस चला चला करू गोड

नवे संकल्प करू नि चला लावू त्याचे झाड

संकल्पाच्या या झाडाला प्रयत्नांचे घालू खत

झाड वाढेल जोमाने,फळांची वाढे प्रत…

 

वर्ष नविन येईल फुलवू या नव्या आशा

नव्या वर्षाचा वाजू द्या तडम् तडम् तो ताशा

गुढी उभारा उंच नि पहा पहा नवी स्वप्ने

हाती लागती प्रयत्ने सुंदर ती नवी रत्ने…

 

कष्टाचाच घ्या हो नव्या वर्षात तो वसा

इतरांना हसवा नि खळखळून तुम्ही हसा

करा नात्यांची जोडणी जपा मने इतरांची

एवढ्या तेवढ्यावरून हो नको नको इतराजी…

 

काळ आला हो कठीण किती गेले पहा मोती

ठेवा सांभाळून आता जे जे आहे पहा हाती

नका दुखवू कुणाला घ्यावे आता सांभाळून

नही भरवसा आता कधी तापेल हो उन…

 

खाऊ गोडधोड आणि चला बोलू गोडगोड

आप्त जनांचे पुरवू चला आता लाडकोड..

गुढी येईल घेऊन सुख समृद्धी बरकत

ओम शांती शांती म्हणा जोडा प्रेममय नातं…

 

नव्या वर्षाच्या शुभेच्छा मिळो तुम्हा आयुरारोग्य

आप्तसुहृद तुम्ही हो आहे माझे अहोभाग्य

नाते असेच सुदृढ राहो नेहमी प्रेमाचे

खूप महात्म्य आहे हो, गुढीपाडवा दिनाचे..

 

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा