You are currently viewing गुढीपाडवा

गुढीपाडवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुढीपाडवा*

 

उत्साहासवे हूरहूर लागे निरोप घेई गतवर्ष आले नवे नवे वर्ष

 

पुराणातील पराक्रमांची इतिहासातील शौर्य कथांची

वर्तमानातील कर्तृत्वाची गुढी उभारू सहर्ष

आले नवे नवे वर्ष

 

देवा मागणे तुजशी न अन्य

काळ्या मातीत पिकू दे धन्य

कर्ज फिटता भूमिपुत्रांचे संपेल मग नैराश्य

आले नवे नवे वर्ष

 

सर्व समाजातील समतेची

निरक्षरांच्या साक्षरतेची दुर्बलांच्या सहाय्यतेची गुढी उभारू सहर्ष

आले नवे नवे वर्ष

 

पगार घेई कुणी लाखामध्ये

प्रमाणपत्र कुणी घेऊन हिंडे

दरी वाढता दोघांमधली काय उद्याचं भविष्य आले नवे नवे वर्ष

 

ज्ञानदीपच्या प्रकाशाची विज्ञानाच्या उत्तुंगतेची कला क्रीडांच्या विक्रमांची

गुढी उभारू सहर्ष

आले नवे नवे वर्ष

 

भ्रष्टाचाराची बजबज पुरी

महान आपुला देश पोखरी

चैतन्याचा, मांगल्याचा आता होऊ दे स्पर्श आले नवे नवे वर्ष

 

फडकवू पताका कीर्तीची

वाहवा मिळवू या दुनियेची

महती सांगण्या भारतभूची

गुढी उभारू उंच

आले नवे नवे वर्ष

 

भारती महाजन-रायबागकर चेन्नई

9763204334

प्रतिक्रिया व्यक्त करा