*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ओळख बारा महिन्यांची*🚩🚩
*चैत्र* महिना बहराचा,
आंबे मोहोर फुलण्याचा…..
*वैशाखात रणरण* ऊन ,
आग ओके चहुकडून …..
*जेष्ठांतील* मंगळागौर
सावित्रीची महती थोर…..
*आषाढाची* वारी पंढरी
स्नान चांद्रभागे तीरी…..
*श्रावणात* सरसर सरी
इंद्र धनुष्य केंव्हा तरी…..
*भाद्रपदात* आगमन गणेशाचे
श्राद्ध घालू पितृपक्षाचे…..
*आश्विन* मास नवरात्रीचा
गरबा टिपऱ्या गमतीचा…..
*कार्तिक* मासी दिवाळी
आतिषबाजी आभाळी…..
*मार्गशीर्षात* दत्त आरती
महालक्ष्मीला मस्तक जुळती…..
*पौष* मासी सण आला
तिळगुळ घ्या नि मधुबोला…..
*माघाची* थंडी असते बोचरी
शेकोटी पेटवा दारोदारी….
*फाल्गुन* महिना होळी पूजन
धुळवाडीची उधळू उधळण….
बारा महिने अगणित सण
चला करू या त्यांची आठवण…..
*शीला पाटील .चांदवड.*