You are currently viewing शिकण्याची ओढ फार महत्त्वाची

शिकण्याची ओढ फार महत्त्वाची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी. देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*लेखमाला: मागे वळून पहातांना*

(लेख – ६ वा )

*शिकण्याची ओढ फार महत्त्वाची*

——————————–

नमस्कार मित्रांनो,

आपल्याला माझा हा लेखन उपक्रम उपयुक्त वाटतोय “,

हे अभिप्राय माझ्यासाठी उत्साहवर्धक आहेत.

 

आयुष्यात आपण सतत नव्या नव्या लोकांच्या संपर्कात येतो, त्यांच्या सहवासात खुप काही शिकण्याची संधी आपल्याला मिळत असते. माझ्या अनुभवातून मी एक शिकलो की –

“आपण सोडून , ईतर सगळे आपल्यापेक्षा सरस असतात, श्रेष्ठ असतात, प्रत्येकाकडून घेण्यासारखे असते “,

हे जर त्या त्या वेळी आपण घेऊ शकलो नाहीत “, तर आपण स्वतःला खरेच कमनशिबी समजले पाहिजे.

 

स्वतःच्या क्षमतेबद्दल भलतेच भ्रम ,आपण बाजूला ठेवले पाहिजेत, नेमकं काय कमी आहे ? कुठे आपण कमी पडतो ? या गोष्टींचे आत्म-परीक्षण, चिंतन करणे अतिशय गरजेचे असते. प्रसंगी अहंभाव, दुजाभाव , स्पष्ट बोलण्याच्या नावाखाली उद्धटपणे वागणे “, हे दुर्गुण आहेत, हे ओळखून , वागण्या-बोलण्यात, बदल करण्याची लवचिकता स्वभावात आणली तर ” होणारे खूप मोठे नुकसान टाळता येणे शक्य होते.”

 

स्वतःबद्दल “नाहक न्यूनगंड ” बाळगणे , म्हणजे स्वतःच्या हाताने पुढे जाण्याची वाट अधिक बिकट करण्याची चूक आहे.

सगळ्यांना सगळं जमतं ” असे मुळीच नाही. जे येत नाही,

ते कसे येत नाही ? असा आग्रह बरोबर नाही. त्यासाठी

नम्रतेने, गोडीने नव्या गोष्टी माहिती करून घेता येतात,

शिकता येतात.

यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतात. तुम्ही स्वतःला ” मी यंव आहे, त्यांव आहे ” अशा टेकीत वावरत असाल तर, कुणी येणार नाही तुमच्यापर्यंत.

 

माझ्या उमेदवारीच्या काळात – प्रत्येक मित्राकडून,

कार्यालयातील सहकाऱ्यांकडून, साहित्य क्षेत्रात वावरताना

जेष्ठ, समवयस्क, वयाने लहान , नवोदित, सुप्रसिद्ध ”

सगळ्याकडून शिकलो, या सगळ्यांचे नवे लेखन,

प्रकाशित साहित्य वाचक म्हणून आवर्जून वाचायचो,

त्यांना अभिप्राय द्यायचो.

यात कवी, लेखक , कवयित्री, लेखिका असे सारे स्नेहीजन

होते.

80-90 च्या दशकातील त्यावेळचे जेष्ठ साहित्यीक-

श्रीकांत सदावर्ते, तु. शं. कुलकर्णी, चित्रकार – कवी भ.मा.परसावळे, श्री.दि. इनामदार, चंद्रकांत भालेराव,

प्रकाश मेदककर, प्रकाश कामतीकर, रा.रं. बोराडे,

डॉ.धुंडीराज कहाळेकर , दिवाकर खोडवे,

अनंतराव उमरीकर, अशा अनेकांनी

माझ्यावर साहित्य संस्कार केले.

 

कवी – फ. मु. शिंदे , विलास वैद्य, इंद्रजित भालेराव, रेणू पाचपोर, प्रभाकर साळेगावकर, शंकर वाडेवाले, गौतम सूर्यवंशी, विश्वास वसेकर,रमेश चिल्ले, सुरेश सावंत,

देविदास फुलारी, बाबा कोतंबे, मोहन. मु.कुलकर्णी,

उद्धव भयवाल, नागेश शेवाळकर अशा अनेकांनी प्रेरणा दिल्यात.

 

कवींच्या कवितांनी मला काव्य लेखनाची दृष्टी दिली.

लेखकांनी कथा, लेख लेखनाचे धडे समोर ठेवले,

माझ्या क्षमतेने मी नवे नवे शिकलो, या मित्रांना माझ्या “शिकण्याची ओढ “समजली होती, म्हणूनच या सर्वांनी

वेळोवेळी मला लेखन मदत केली.

 

आज या मंडळीशी लेखन – संपर्कात आहे.

 

पुढच्या लेखात अजून नवे काही ..

—————————————

लेखमाला- मागे वळून पहातांना (लेख-६ वा )

-अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342

प्रतिक्रिया व्यक्त करा