You are currently viewing कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच” दीर्घ कवितेचा अनुवाद आता हिंदी एम. ए.च्या अभ्यासक्रमात

कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच” दीर्घ कवितेचा अनुवाद आता हिंदी एम. ए.च्या अभ्यासक्रमात

कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच” दीर्घ कवितेचा अनुवाद आता हिंदी एम. ए.च्या अभ्यासक्रमात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे सन्मान

कणकवली

लोकवाड:मय गृह मुंबई प्रकाशित सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दीर्घ कवितेच्या एका वर्षात तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. दूरदर्शनने त्यावर नाट्य निर्नितीही केली.आता सदर दीर्घ कवितेचा हिंदी अनुवाद बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी एम.ए. अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

‘युगानुयुगे तूच’ दीर्घ कविता प्रकाशित झाल्या नंतर तिला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.त्यावर मराठी साहित्यातील मान्यवर समीक्षकांनी दीर्घ लेखन केले असून समीक्षक प्रा.एकनाथ पाटील यांनी त्यावरील संपादित केलेला समीक्षा ग्रंथही लोकवाड:मय गृहने प्रसिद्ध केला आहे. आता या कवितेचा हिंदी अनुवाद संभाजीनगर (औरंगाबाद) येथील ख्यातनाम अनुवादक प्रा.डॉ.सुधाकर शेंडगे यांनी केला असून दिल्लीतील वाणी या हिंदी मधील विख्यात प्रकाशनाने हा अनुवाद प्रकाशित केला आहे.आता हा अनुवाद बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी एम. ए.च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून पुढील तीन वर्षासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तरुण चित्रकार प्रशीक पाटील यांनी या अनुवादाच्या मुखपृष्ठाचे आवरण चित्र रेखाटले असून देशभरातील महत्वाच्या हिंदी ग्रंथ भंडारात सदर अनुवाद संग्रह आता उपलब्ध करून देण्यात आला आहे.तसेच गुगलवर सर्च करूनही हा अनुवाद संग्रह वाचकांना मागवता येईल.अशी माहिती वाणी प्रकाशनाकडून देण्यात आली आहे.

हिंदी अनुवादाला हिंदीतील ख्यातनाम साहित्यिक डॉ.जयप्रकाश कर्दम यांची दीर्घ प्रस्तावना लाभली असून त्यात ते म्हणतात,’युग युग से तू ही ‘ (युगानुयुगे तूच ) ही बाबासाहेब यांच्यावरील अजय कंडर यांनी रचलेली आणि सुधाकर शेंडगे यांनी मराठीतून हिंदीत अनुवादित केलेली मराठीतील महत्वाची दीर्घ कविता आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, संघर्ष आणि त्यांनी सामाजिक केलेल्या क्रांतिकारी कार्यांचे सविस्तर विवेचन या कविता संग्रहात करण्यात आले आहे. वर्तमान परिप्रेक्ष्यातूनही ती मूल्यमापन करते. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा मार्ग दाखवला. हा वाकडा मार्ग नाही, तो अगदी सरळ आणि सोपा आहे. या मार्गावर कोणीही चालू शकतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या मार्गावर सर्वजण मिळून चालु शकतात.या मार्गाचा अवलंब केल्याने कोणीही उच्च-नीच,लहान-मोठा-अस्पृश्य-म्हणून दिसणार नाही, सर्व मानव एक दिसतील. कवी बाबासाहेब आंबेडकरांकडे जातीपातीच्यावर उठून मानवतेवर विश्वास ठेवणारा आणि मानवी मूल्यांच्या स्थापनेवर भर देणारा महापुरुष म्हणून पाहतो. कवी कांडर म्हणतात ते खरच आहे की बाबासाहेब यांच्या रक्तात ना जात, ना धर्म, ना पंथ देव कुठेच दिसत नाही. कारण बाबासाहेब हे एकमेव महापुरुष होते ज्यांनी जातिहीन आणि वर्गहीन समाजाच्या निर्मितीचे आवाहन केले आणि त्यासाठी दीर्घकाळ संघर्ष केला.त्यामुळे भारतीय पातळीवर या कवितेच्या हिंदी अनुवादाला चांगला प्रतिसाद मिळेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा