कुडाळ:-
श्री जगन्नाथ संगीत विद्यालय आयोजित
संगीत शैक्षणिक कार्यशाळा मंगळवार दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या आंदुर्ले-सावरीचे भरड, तालुका कुडाळ येथील निवासस्थानी तबला उस्ताद अमीर हुसेन खा साहेब यांच्या ५२ व्या बरसी चे औचित्य साधून श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज वादक विद्यार्थी वर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. तरी या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे :-
१) सकाळी ८ वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन, दीपप्रज्वलन, २)सकाळी ८.३० वा.संगीत अलंकार कु.प्रफुल्ल रेवंडकर भक्तीगीत, ३)सकाळी ९ वा. संगीताचार्य गुरुवर्य डॉ.श्री सचिन कचोटे (कोल्हापूर) यांचे उपस्थित सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि वादनातील बारकावे तसेच परीक्षा अभ्यासक्रम तयारी आणि रियाज व अनेक शास्त्रीय रचनांचे शिक्षण प्रशिक्षण तसेच अनेक संगीत विषयक प्रश्न यांना उत्तरे आणि प्रात्याक्षिक, ४) दुपारी १.३० मध्यांतर
दुसरे सत्र = १)२.३० वाजता पखवाज विशारद श्री दत्तप्रसाद खडपकर आणि श्री सचिन कातवणकर यांचे उपस्थित पखवाज विद्यार्थ्यशी पखवाज विषयी चर्चासत्र २) सायंकाळी ४ वाजता पखवाज सामूहिक वादन ताल शंकर ११ मात्रा(ताल पर्व भाग ४), ३) सायंकाळी ४.३० वाजता संगीताचार्य श्री सचिन कचोटे सर यांचे शास्त्रीय तबला वादन, ४) सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमाची सांगता कोकण परंपरेतील संगीत सुश्राव्य भजनाने होईल त्याला साथसंगत उपस्थित सर्व विद्यार्थिवर्ग आपल्या पखवाज वादनाची साथ सर्वजण सामूहिक करणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमासाठी लेहरासाथ कु.अमित उमळकर यांची लाभेल. तसेच तबला वादन श्री अरुण केळुसकर, श्री धनंजय सावंत आणि कु.अतुल उमळकर यांची लाभेल. कार्यक्रमाचे आयोजक: पखवाज अलंकार श्री महेश सावंत(कुडाळ-आंदुर्ले),श्री जगन्नाथ संगीत विद्यालय संचालक, प्रशिक्षक, समस्त विद्यार्थिवर्ग.