You are currently viewing नांदगाव येथील हायवे हद्द निश्चित करण्यासाठी १२ एप्रिलला होणार मोजणी

नांदगाव येथील हायवे हद्द निश्चित करण्यासाठी १२ एप्रिलला होणार मोजणी

नांदगाव येथील हायवे हद्द निश्चित करण्यासाठी १२ एप्रिलला होणार मोजणी

२४० लगत असलेल्या जमीन मालकांना बजावल्या नोटीसा; नांदगाव तिठा ते ओटवफाटा जागेची होणार हद्द निश्चित

कणकवली
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपद्रीकरण करण्यासाठी लगत असलेल्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करुन सदर महामार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. नांदगाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्ता पूर्ण झाला पण महामार्गाची हद्द निश्चित करण्यासाठी २४० लगत असलेल्या जमीन मालकांना नोटीसा बजावल्या असून १२ एप्रिलला मोजणी होणार आहे.

नांदगाव येथील महामार्गालगत शासनाच्या मालकीची हद्द कुठपर्यंत असणार आहे. याबाबत हद्द निश्चित करण्यासाठी शुक्रवार दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी मोजणी होणार आहे. दरम्यान याबाबत लगत असलेल्या २४० शेतकऱ्यांना हजर राहण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
नांदगाव तिठा ब्रिज व ओटवफाटा ब्रिज लगत असलेल्या जागेची हद्द निश्चित अगोदर केली जाणार असून उर्वरित पुढील टप्प्यात होणार आहे .
मागील महिन्यातच काही जमीन मालकांना नोटीसा बजावून मोजणी केली जाणार होती.मात्र त्यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नागेश मोरये यांनी हरकत घेवून जोपर्यंत सर्वांना मोजणी नोटीस बजावत नाही, तोपर्यंत मोजणी करायची नाही अशी भूमिका घेतल्याने ती मोजणी बंद पाडली होती.

अखेर आता २४० शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. जर नजरचुकीने नाव किंवा पत्ता बदल अभावामुळे सदर मोजणी नोटीस मिळाली नाही तर मोजणी ठिकाणच्या संबंधित असलेल्या जमीन मालकांना मोजणी दिवशी उपस्थित रहावे,असे आवाहन महामार्ग प्राधिकरण तर्फे करण्यात आले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा