आंबेडकर जयंती निमित्त सावंतवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
सावंतवाडी,ता.०६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सावंतवाडी समाज मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आंबेडकरी अनुयायाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आंबेडकर समाज प्रबोधन समिती ने केले आहे.
या संदर्भात समन्वय समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सावंतवाडी तालुक्यातील सर्व आंबेडकरी अनुयायांच्या विविध संघटना व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहाने व विविध कार्यक्रमाने साजरा होत असून त्यानुसार चालू वर्षीही येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे विविध कार्यक्रमाने हा साजरा होणार आहे.
मंगळवार ०९ एप्रिला येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी ११ एप्रिल रोजी सकाळी श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस व संस्थेचे सन्मानचिन्हे ठेवण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्यांना जयंती दिवशी खास मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे . रविवार १४ एप्रिल रोजी मुख्य कार्यक्रम होणार असून सकाळी ध्वजारोहण, त्यानंतर त्रिशरण पंचशील, बुद्ध पूजा पाठ इत्यादी कार्यक्रम आहेत. त्यानंतर जाहीर अभिवादन सभा होणार असून यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी समाज प्रबोधन समन्वय समितीचे अध्यक्ष केशव जाधव हे असून प्रमुख व्याख्याते बुद्धिस्ट इंटरनॅशनल चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संजय कदम हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सागर साळुंखे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून जगदीश चव्हाण हे राहणार असून या अभिवादन सभेनंतर दुपारी स्नेहभोजन व त्यानंतर परिवर्तनवादी विचारांचा जागर सत्यशोधक शाहिरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .सायंकाळी पाच वाजता जय भिम रॅली हे विशेष आकर्षण असून भव्य मिरवणूक होणार असून त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमात आंबेडकर अनुयायाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व आपले आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीचे अध्यक्ष केशव जाधव, उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, सचिव विनायक जाधव, मोहन नेर्लेकर,कांता जाधव,लाडू जाधव,सुनिल जाधव, सुरेश जाधव,भालचंद्र जाधव,शांताराम असणकर ,अनिल जाधव,सहसचिव सगुण जाधव व खजिनदार लक्ष्मण कदम यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*
*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*
*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*
*आमची खास वैशिष्ट्ये*👇
*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*
*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*
*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*
*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*
*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*
*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*
*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*