You are currently viewing मालवणीकरांच्या सेवेत एक नवीन रस्ता

मालवणीकरांच्या सेवेत एक नवीन रस्ता

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

मालवणी गेट क्र.६ ते लगून रोडला जोडणाऱ्या रस्त्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते लोकार्पण

मालाड

मालाड (प.) मालवणी गेट क्र.६ ते लगून रोडला जोडणाऱ्या रस्त्याचे लोकार्पण मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले

रहदारीच्या (Traffic) समस्येचा सामना करणाऱ्या मालवणीच्या नागरिकांना या नव्या रस्त्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेली अनेक वर्ष स्थानिकांकडून नव्या रस्त्याची मागणी केली जात होती.

हा नवा मार्ग मालवणी गेट क्र.६ पासून सुरू होत थेट लगून रोडला जोडणार असल्याने मालाड मार्वे मार्गाला जोडणाऱ्या अब्दुल हमिद रोडवरचा ताण कमी होणार आहे.

मालवणी म्हाडा वसाहतीमधील नागरिकांना मालवणी गेट क्र. १ किंवा मार्वे मार्गावर येण्यासाठी तासन-तास ट्राफिकमध्ये ताटकळत रहावे लागे. अब्दुल हमीद रोडला पर्यायी मार्गाची सुविधा उपलब्ध झाल्याने गेट क्र.६ वरुन थेट लगून मार्गावरुन मार्वे रोडवर येणं शक्य होणार आहे व त्यामुळे ट्राफिकमध्ये होणाऱ्या खोळंब्यातून मालवणीवासीयांची सुटका झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा