You are currently viewing महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त विनामूल्य पुस्तके

महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त विनामूल्य पुस्तके

अमरावती  –

 

स्थानिक डाँ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमा च्या वतीने येत्या 10 एप्रिल रोजी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्ताने तसेच 11 एप्रिलच्च्या महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त व शासकीय विदर्भ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तसेच 14 एप्रिल रोजी येणाऱ्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने स्पर्धा परीक्षेच्या पाच पुस्तकांचे ऑनलाइन विनामूल्य वितरण करण्याचे ठरविण्यात आले आहे .त्यासाठी ज्यांना ही पुस्तके हवी आहे त्यांनी 9890967003 या प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्या क्रमांकावर मला पुस्तके पाठवावी असा संदेश द्यावयाचा आहे. या पुस्तकांमध्ये मी आयएएस अधिकारी होणारच.शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर. .मी आयएएस अधिकारी होणारच भाग 2. स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी .आयएएस अधिकार्‍यांची संघर्षगाथा,आयपीएस अधिकाऱ्यांची संघर्षगाथा. स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी हिंदी .स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी इंग्रजी. सक्सेस स्टरीज ऑफ आयएएस ऑफिसर .सक्सेस स्टोरीज ऑफ आयपीएस ऑफिसर या पुस्तकांपैकी पाच पुस्तकांचा समावेश आहे .या पुस्तकांच्या पीडीएफ फाईल्स सर्व संदेश देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना व पालकांना विनामूल्य देण्यात येणार आहेत.डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही भारतातील सगळ्यात मोठी आयएएस अकादमी असून या उपक्रमात जवळपास एक लाख विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. हे सर्व उपक्रम विनामूल्य असून विद्यार्थ्यांना फक्त नाममात्र एक रुपया शुल्कामध्ये दुसऱ्या वर्गापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आय ए एस या परीक्षेचे प्रशिक्षण दिल्या जाते .विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची त्या-त्या वर्गाची पुस्तके विनामूल्य वितरित करण्यात येतात. अशाप्रकारे मिशन आयएएस खऱ्या अर्थाने राबणारी भारतातील एकमेव अकादमी आहे .या अकादमीला आतापर्यंत 350 आयएएस, आयपीएस,आयएफएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून भारताच्या माजी राष्ट्रपती महामहीम श्रीमती प्रतिभाताई पाटील योगगुरू श्री रामदेव बाबा सुप्रसिद्ध समाजसेवक श्री अंण्णा हजारे त्याच बरोबर सुप्रसिद्ध समाजसेवक श्री पोपटराव पवार,डॉ. श्रीराम लागू,निळू फुले, बाबा आढाव, नरेंद्र दाभोळकर,गोविंद पानसरे,मेधा पाटकर, आदी मान्यवरांनी या संस्थेमध्ये या संस्थेच्या उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विनामूल्य पुस्तकाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीच्या मिशन आय ए एस च्या वतीने प्रा पल्लवी नरेशचंद्र काठोळे यांनी केले आहे.

 

प्रकाशनार्थ

प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =