कार्यालयात कर्मचारी अधिकारी उपस्थित नसल्याने मनसेने खुर्च्यांना पुष्पहार घालून केले गांधीगिरी स्टाईल आंदोलन
कुडाळ
कुडाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या मनमानी व बेजबाबदार कारभाराचा निषेध वर्तवण्यासाठी गांधीगिरीने उपअभियंता व शाखा अभियंता यांच्या खुर्च्यांना पुष्पहार अर्पण करून आपला निषेध व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार व भोंगळ कारभाराविरोधात कुडाळ तालुका मनसे शिष्टमंडळाने कार्यालयात अनपेक्षितपणे हजेरी लावत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतलेली होती यामध्ये कर्मचारी कार्यालयात उपस्थित न राहता उपस्थित नसल्याचे दिसून आले होते तर नंतर तालुक्यातील बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था खड्डेमय परिस्थिती आणि वाढलेली झाडे झुडपे या संदर्भात प्रश्नांचा भडिमार केला होता आजपर्यंत केलेल्या खर्चाचा हिशोब अधिकाऱ्यांकडे मागितलेला होता यासंदर्भात गुरुवारी मनसे शिष्टमंडळाची चर्चा करण्याचं आश्वासन उपविभागीय अभियंता अनामिका जाधव यांनी दिले होते त्याप्रमाणे आज गुरुवार मनसे कार्यकर्ते सकाळी साडेदहा वाजता कार्यालयात उपस्थित झाले मात्र नेहमीप्रमाणे कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता फक्त शिपाई दप्तर उघडून बसले होते यासंदर्भात बारा वाजेपर्यंत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकार्यांचे वाट बघून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या मनमानी व बेजबाबदार कारभाराचा निषेध वर्तवण्यासाठी गांधीगिरी त्यांनी उप अभियंता व शाखा अभियंता यांच्या खुर्च्यांना पुष्पहार अर्पण करून आपला निषेध व्यक्त केला खड्डेमय परिस्थितीमुळे जनतेच्या होणाऱ्या वेदना व मोडणारे पाठीचे करणे याबाबत तात्काळ दखल घेऊन वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे येत्या सात दिवसात न सुरू झाल्यास त्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाती घेईल असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला