*दिल्लीच्या लोकसभेत प्रभुत्त्व असलेला खासदार आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून निवडून देवूया – निलेश राणे*
*कुडाळ*
रत्नागिरी सिंधुदुर्गला खासदार आहे की नाही हेच दिल्लीकरांना माहित नाही.जो उबाठा खासदार इथून गेली दहा वर्षे खासदार आहे त्याला दिल्लीत कोण ओळखतही नाही आणि विचारत सुद्धा नाही. साधा वाचमन विचारत नाही.या मतदार संघातून फार मोठी माणसे निवडून गेली.मात्र आज केंद्राला आठवत नाही की या दोन जिल्हातून एक खासदार आहे. तो कोण आहे ? उबाठा चा विनायक राऊत हा खासदार कोणालाच माहीत नाही. त्यामुळेच दिल्लीच्या पार्लमेंट मध्ये प्रभुत्त्व असलेला खासदार आपण पाठवूया. दिल्लीत नाव घेतले तरी कळले पाहिजे की रत्नागिरी सिंधुदुर्गचा हा खासदार आहे. असा दरारा आणि विकासाचे व्हिजन असलेले असे व्यक्ती महत्व निवडून देवूया असे आवाहन भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.
५४३ खासदार लोकसभेत जातात त्यात उबाठाच्या खासदाराने काय काम केले याचा लेखा जोगा जनतेला द्या. या खासदार ने आमची जनतेची दहा वर्षे फुकट घालवली.
हेच विनायक राऊत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न सोडवू शकले नाही, विमानतळ आम्ही केला तेव्हा हे खासदार विमानतळ नको म्हणून विरोध करत होते आणि उद्घाटन करताना यांची सत्ता होती तेव्हा नारळ फोडण्यासाठी व्यासपीठावर पहिले होते, झारा पत्रदेवी हायवे नको म्हणून विरोध करणारे विनायक राऊत आता त्याच रस्त्याने ये जा करतात
राणेंनी मेडिकल कॉलेज आणलं म्हणून फक्त विरोध करून जिल्ह्यात दुसरे मेडिकल कॉलेज आणण्याचा घाट घातला परंतु आता त्या मेडिकल कॉलेजची दुर्दशा काय आहे ते जाऊन एकदा बघा