You are currently viewing कणकवली हळवल येथे हळवल – शिरवल मार्गावर तीन वाहनांमध्ये अपघात

कणकवली हळवल येथे हळवल – शिरवल मार्गावर तीन वाहनांमध्ये अपघात

कणकवली हळवल येथे हळवल – शिरवल मार्गावर तीन वाहनांमध्ये अपघात

कणकवली :

तालुक्यातील हळवल येथे हळवल – शिरवल मार्गावर तीन वाहनांमध्ये अपघात झाला. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वा. च्या. सुमारास झाला. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, धडक देणाऱ्या डंपरचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. तर तेथेच उभ्या असलेल्या डंपरला मागाहून येणाऱ्या डंपर ची धडक बसली आणि हा अपघात झाला. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

हळवल कळसुली शिरवळ मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची वर्दळ असते काही वेळा या ठिकाणी ओव्हरलोड खडी वाहतूक केल्यामुळे अपघात झालेले आहेत सोमवारी सकाळी हळवल गिरण नजीकच्या तीव्र उतारावर डंपर क्रमांक (एम एच ०७ एजे ९०४५) चा चालक तेथे मूळ मालकाकडून पास घेण्यासाठी थांबला होता. तर त्या डंपर मालकाने डंपर समोरच आपली दुचाकी लावून रस्त्याच्या बाजूला थांबून बोलत होते. एवढ्यात शिरवलहून कणकवलीच्या दिशेने खडी वाहतूक करणारा डंपर ( एमएच ०७ सी ५१९९) जात होता. उभ्या असलेल्या डंपर ला ओव्हरटेक करून जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्यासाठी ( एमएच ०७ सी ५१९९) च्या चालकाने आपल्या ताब्यातील डंपर कणकवलीच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला घेतला. मात्र डंपर मध्ये ओव्हरलोड खडी असल्याने त्या तीव्र उतारावर डंपरवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. हा अपघात एवढा तीव्र होता की, या अपघातात डंपर क्रमांक ( एमएच ०७ सी ५१९९) च्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. तर डंपर चालक हा डंपरमध्येच अडकून पडला. चालकाच्या छातीला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली. तर धडक दिलेल्या डंपरचे मागील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. या दनही डंपरच्या अपघातात तेथील उभी असलेली दुचाकी एका डंपरखाली चिरडली गेली. अपघाताची माहिती मिळताच हळवल मधील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मागील डंपर मध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हळवल – शिरवल – कळसुली या मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक केली जाते. यासाठी वापरले जाणारे डंपर हे भरधाव वेगाने जात असल्याने या ठिकाणी वारंवार छोटे – मोठे अपघात होत असतात. त्यामुळे या रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरना वेळीच आवर घाला, अशा प्रतिक्रिया येथील नागरिकांमधून उमटत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा