You are currently viewing वैभववाडी शुकनदीनजीक ट्रकने मोटरसायकला दिलेल्या जोरदार धडकेत पादचारी गंभीर जखमी

वैभववाडी शुकनदीनजीक ट्रकने मोटरसायकला दिलेल्या जोरदार धडकेत पादचारी गंभीर जखमी

वैभववाडी शुकनदीनजीक ट्रकने मोटरसायकला दिलेल्या जोरदार धडकेत पादचारी गंभीर जखमी

वैभववाडी

उभ्या असलेल्या मोटरसायकला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत मोटरसायकल पादचाऱ्याच्या अंगावर पडली. या अपघातात पादचारी रामचंद्र आकाराम रावराणे वय ६५ रा. एडगांव इनामदारवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. हा अपघात वैभववाडी शुकनदी नजीक सायंकाळी ७ वा. च्या सुमारास घडला. जखमी रामचंद्र रावराणे यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वैभववाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून वैभववाडी च्या दिशेने ट्रक जात होता. दरम्यान शुकनदिनजीक शिवाजी राठोड मकबूल अन्सारी व अन्य एक जण हे मोटरसायकल उभी करून साईड पट्टीवर बोलत उभे राहिले होते. ट्रकची मोटरसायकलला जोरदार धडक बसली. दरम्यान एडगांवच्या दिशेने पायी चालत जाणारे रामचंद्र रावराणे यांच्या अंगावर मोटरसायकल पडली. या अपघातात आकाराम रावराणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात घडताच ट्रक चालक हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. जखमी रावराणे यांना स्थानिकांनी तात्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कणकवलीकडे हलविण्यात आले आहे. तर मोटरसायकल चालक शिवाजी राठोड किरकोळ जखमी झाला आहे. मकबूल अन्सारी अंसारी व अन्य जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक श्री अवसरमोल व पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईक व पोलिसांनी जखमी रावराणे यांना उपचारासाठी पुढे हलवले आहे. या अपघाताचा पंचनामा वैभववाडी पोलिस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − twelve =