You are currently viewing बांदा-दाणोली मार्गावर अपघाताची शक्यता

बांदा-दाणोली मार्गावर अपघाताची शक्यता

*बांदा-दाणोली मार्गावर अपघाताची शक्यता*

बांद्यातील सजग नागरिकांकडून बांधकाम विभागास कार्यवाही बाबत निवेदन सादर

बांदा

बांदा-दाणोली-आंबोली मार्गे कोल्हापूर या रस्त्यावरील बांदा ते दाणोली हा पट्टा अरुंद रस्त्याचा व वळणावळणाचा असून सदर मार्गावरील वाहतूक ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे.सदर मार्ग हा अनेक गावांमधून जात असून याच मार्गावर लागून अनेक शाळा आहेत. तसेच आंबोली मार्गे येणारे खडी वाहतूक करणारे डंपर, मालवाहतूक करणारे ट्रक,अवजड वाहने,पर्यटकांच्या वाढलेल्या वाहन संख्येमुळे या अरुंद रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, सदर रस्त्यावर वरचेवर किरकोळ स्वरूपाचे अपघात नेहमीच होत असतात. याची दखल घेऊन बांदा येथील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री गुरु कल्याणकर,हेमंत दाभोलकर,गुरुनाथ सावंत,ज्ञानेश्वर सावंत व ग्रामपंचायत सदस्य श्री प्रशांत बांदेकर,रत्नाकर आगलावे यांचेकडून सार्वजनिक बांधकाम विभागास आज निवेदन सादर करण्यात आले.

सदर निवेदनाद्वारे या रस्त्यावरील साईड पट्ट्यांवर सफेद पट्टे मारणे, गतिरोधक असलेल्या ठिकाणी रिफ्लेक्टर्स लावणे, आवश्यक त्या ठिकाणी रंबल्स लावणे, दिशादर्शक फलक लावणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या उन्हाळी सुट्टीतील पर्यटकांच्या वाहनांची वाढणारी संख्या व येणारा पावसाळा याचा विचार करून यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी यामध्ये करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा