केद्रशाळा उभादांडा नं.१ च्या दोन विद्यार्थ्यांची नवोदय साठी निवड
वेंगुर्ले
मुलांच्या भविष्याचा उज्ज्वल पाया मजबूत करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.सी.) अभ्यासक्रमाची मोफत सोयी सह शासकीय निवासी शाळेत शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नवोदय विद्यालयाची निवड चाचणी फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आली. घेण्यात आलेल्या या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणीमध्ये उभादांडा नं.1 शाळेच्या इयत्ता पाचवीत शिक्षण घेणा-या कु.अवनिश चंद्रहास नार्वेकर व कु.ऋषभ राकेश तिरोडकर या दोन विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन करत सहावीसाठी प्रवेश मिळविला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतूक होत आहे. त्यांना वर्गशिक्षक श्री. एकनाथ जानकर, सुहास रेडेकर, अनिशा झोरे मुख्याध्यापक गणेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, केंद्रप्रमुख भागोजी अडूळकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन नरसुले,अण्णा रेडकर, शांताराम भोने तसेच पालक व शिक्षण प्रेमींनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. अभिनंदन केले आहे.