*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*
*श्री गजानन विजय ग्रंथ*
अध्याय दहावा
सुकलाल आगारात
एक होती द्वाड गाय
सशक्तांसी हुंदाडावे
कैसे म्हणू तिज माय ||
दुकानांत शिरूनिया
धान्य यथेच्छ खातसे
तेल तुपाचे पिंप हो
धक्का देत पाडतसे ||
लोकं कंटाळले फार
सोसूनीया तिचा त्रास
गोळ्या घालून मारा वा
द्यावे तिज खाटीकास ||
शेगांवीच्या समर्थांना
गाय करावी अर्पण
पुण्य दानाचे मिळेल
संकटाचे निरसन ||
ढीग हरळकुंद्याचा
सर्व मिळून रचला
फांस टाकून बांधली
बंदोबस्त छान केला ||
साखळदंडाने गाय
गाडीवर ती बांधली
शेगांवास येता येता
शांत गरीब जाहली ||
समर्थांच्या पायावरी
पाय टेकले गायीने
केल्या तीन प्रदक्षिणा
जगताच्या या मायेने ||
समर्थकृपेने गाय
सूज्ञ गुणी शांत होई
कृपा समर्थांची होता
विचारांत क्रांती येई ||
परिणाम बदलांचा
होई सुयोग्य सदैव
बोध जाणा अध्यायाचा
जपा अनमोल ठेव ||
©️®️
सौ.मंजिरी अनसिंगकर,
नागपूर.