You are currently viewing सासर

सासर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

*सासर* *6/6/6/4* 

 

सासरच्या दारी /मोगरा फुलतो

दरवळ पसरतो /चोहीकडे

 

सासुबाई भोळी/ मामंजी सज्जन

न कोणी दुर्जन/ सासरात

 

कारभारी माझा / भोळा सदाशिव

नसते उणीव / कुटुंबात

 

तुळशीचे रोप /माझिया अंगणी

एकचि मागणी / ठेव सुखी

 

गोठ्यात कपिला/ वासराची माय

दुधावर साय/ गोकुळात

 

अंगणात झाड/ पक्षी, फळे फुले

नाचतात मुले/ मैदानात

 

चिऊ काऊ सारे /अंगणात यारे

सायंकाळी जारे /उडुनिया

 

आजीआणि बाबा/ अंगणी बसती

सांगतात गोष्टी /परीकथा

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा