*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*
*श्री गजानन विजय ग्रंथ*
अध्याय दहावा
सुकलाल आगारात
एक होती द्वाड गाय
सशक्तांसी हुंदाडावे
कैसे म्हणू तिज माय ||
दुकानांत शिरूनिया
धान्य यथेच्छ खातसे
तेल तुपाचे पिंप हो
धक्का देत पाडतसे ||
लोकं कंटाळले फार
सोसूनीया तिचा त्रास
गोळ्या घालून मारा वा
द्यावे तिज खाटीकास ||
शेगांवीच्या समर्थांना
गाय करावी अर्पण
पुण्य दानाचे मिळेल
संकटाचे निरसन ||
ढीग हरळकुंद्याचा
सर्व मिळून रचला
फांस टाकून बांधली
बंदोबस्त छान केला ||
साखळदंडाने गाय
गाडीवर ती बांधली
शेगांवास येता येता
शांत गरीब जाहली ||
समर्थांच्या पायावरी
पाय टेकले गायीने
केल्या तीन प्रदक्षिणा
जगताच्या या मायेने ||
समर्थकृपेने गाय
सूज्ञ गुणी शांत होई
कृपा समर्थांची होता
विचारांत क्रांती येई ||
परिणाम बदलांचा
होई सुयोग्य सदैव
बोध जाणा अध्यायाचा
जपा अनमोल ठेव ||
©️®️
सौ.मंजिरी अनसिंगकर,
नागपूर.
*संवाद मीडिया*
*त्वरा करा…त्वरा करा…त्वरा करा…*
*मालवण व मुंबईमधील एकमेव पब्लिकेशन..*
*सुहासिनी प्रकाशनाची आगामी पुस्तके*
*🔹धुमी* (कादंबरी) रू.200/-
*🔸 मुक्काम मालवण – भरड नाका* (आत्मकथन) – रू. 300/-
*🔹श्रावणसरी* (कथासंग्रह) रू. 200/
*🔸 सांदी – कोपरा* (ललित संग्रह) रु.200/-
*लेखक – चंद्रकांत पारकर.*
*🔹आठवणीतले नामवंत* (लेखसंग्रह) (रु. 500/-)
*श्री. रवींद्र वराडकर*
*वरील पुस्तके गणपती सणापूर्वी प्रकाशित होत आहेत.*
*प्रकाशित होण्यापूर्वी खरेदी केल्यास 50% सवलत*
*▪️सुहासिनी प्रकाशन*▪️
*राजगड बिल्डिंग, करीरोड (प.) मुंबई-400013*
*📲संपर्क – 9821427752 / 7558757752*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/130316/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*