युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचा निकाल 3 एप्रिल रोजी
कणकवली
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परिक्षेचे ७ वे वर्ष असून सिधुदुर्ग जिल्ह्यात २६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.सिंधुदुर्ग जिल्हातून १०,४६७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. २ री, ३ री, ४ थी, ६ वी व ७ वी याप्रत्येक इयत्तेतील पहिल्या ५० अशा २५० गुणवंत विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके , सन्मानचिन्ह,मेडेल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे . तसेच 4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील टॉप फाईव गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) या संस्थेला व २ री, ३री , च्या टॉप फाईव विद्यार्थ्याना गोवा येथील सायन्स सेंटर ला भेटी साठी घेऊन जाण्यात येणार आहे. तसेच गुण 152 to 200. Gold, गुण 132 to 150. Silver, गुण112 to 130. Bronze मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.
३ एप्रिल २०२४ रोजी मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दुपारी ठीक ३:०० वाजता सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा online निकाल जाहीर करण्यात येणार आहे. https://bit.ly/sts2024result या लिंक वर बैठक क्रमांक लिहून निकाल पाहता येईल.उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली असून निकाला दिवशी पालक/शिक्षक/विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे.*
3 एप्रिल ते 6 एप्रिल 2024 अखेर हरकती स्वीकारल्या जातील. त्या नंतर 7 एप्रिल 2024 रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी , पालघर व ठाणे जिल्हात आयोजित करण्यात आली आहे.
तरी अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख श्री. सुशांत सुभाष मर्गज(९४२०२०६३२६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा मा सौ संजना संदेश सावंत(माजी जी प अध्यक्ष) यांनी केले आहे.